Goa Football Association Dainik Gomantak
क्रीडा

Goa Football Association: गोवा फुटबॉल असोसिएशनला मिळाले स्पॉन्सर्सचे पाठबळ

वर्धापनदिनी मिळाली भेट; चार वर्षांसाठी दोन कोटीहून जास्त रकमेचा करार

Akshay Nirmale

Goa Football Association: पुरस्कर्त्याअभावी गेली काही वर्षे आर्थिक अडचणीत आलेल्या गोवा फुटबॉल असोसिएशनला (जीएफए) 63 व्या वर्धापनदिनी भेट मिळाली. फुटबॉल साहित्य पुरविण्यासाठी त्यांना नव्या पुरस्कर्त्याचे पाठबळ लाभले.

‘जीएफए’ने ‘व्हेक्टर एक्स’ यांच्याशी साहित्य सहयोगी या नात्याने चार वर्षांचा करार केला असून एकूण रक्कम दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या करारांतर्गत पुरस्कर्ते गोव्याच्या राज्यस्तरीय पुरुष व महिला संघ, ज्युनियर मुलगे व मुलींच्या संघासाठी खेळण्याच्या साहित्याचा भार वाहेल. शिवाय जीएफए स्पर्धांतील रेफरींसाठी साहित्य पुरविण्यात येईल. यासंदर्भात गुरुवारी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली.

‘‘गोव्यात फुटबॉल महोत्सव साजरा होतो. येथील फुटबॉलचा मोठा लौकिक आहे. राज्यातील पायाभूत फुटबॉल विकासाला हातभार लावण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून हा करार करण्यात आला आहे,’’ असे ‘व्हेक्टर एक्स’चे व्यवस्थापक बलजिंदर सिंग यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘‘गोव्यात फुटबॉलच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या दृष्टीने हा करार एक सुरवात आहे. याशिवाय अनेक उपक्रम राबविले जातील,’’ असे जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी नमूद केले. यावेळी जीएफए उपाध्यक्ष अँथनी पांगो व जोनाथन डिसोझा, इतर कार्यकारी समिती सदस्यांची उपस्थिती होती.

महासंघाच्या सचिवांचे आभार

हा करार प्रत्यक्षात येण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव शाजी प्रभाकरन यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे जीएफए उपाध्यक्ष जोनाथन डिसोझा यांनी नमूद केले. जीएफए संघ व रेफरींना फुटबॉल साहित्य पुरवत असताना पुरस्कर्ते जीएफए संलग्न क्लबने खेळण्यासाठी फुटबॉल देणार असल्याची माहितीही जोनाथन यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT