Goa: सासष्टी तालुका रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या तीन स्पर्धकांसमवेत मान्यवर Dainik Gomantak
क्रीडा

रॅपिड बुद्धिबळात एथन वाझ अजिंक्य

सासष्टी तालुका रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा मडगाव येथील बीपीएस क्लब संकुलात संपन्न

Dainik Gomantak

Goa: प्रतिभाशाली युवा बुद्धिबळपटू एथन वाझ (Chess player Ethan Vaz) याने झटपट बुद्धिबळातील (Rapid Chess) वरचष्मा कायम राखताना सासष्टी तालुका रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत (Sattari Taluka Rapid Chess Tournament) विजेतेपद मिळविले. स्पर्धेतील अखेरच्या डावात त्याने रुबेन कुलासो याला नमवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धा मडगाव येथील बीपीएस क्लब संकुलात झाली.

एथन याला विजेतेपदाबद्दल करंडक आणि 2000 रुपयांचे बक्षीस मिळाले. रुबेनला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. व्हिवान बाळ्ळीकर याला तिसरा. आयुष शिरोडकरला चौथा, अथर्व कातकरला पाचवा, तर कविश बोरकरला सहावा क्रमांक मिळविला. साईराज वेर्णेकर, आलेक्स सिक्वेरा, तनाद बांदोडकर यांनाही बक्षीस मिळाले. पहिल्या दहा स्पर्धकांना एकूण 10,000 रुपयांचे रोख बक्षीस विभागून देण्यात आले. करंडक डेन्झिल कुलासो यांनी, उपाहार शिल्पा व सुनील बाळ्ळीकर यांनी पुरस्कृत केला होता.

वयोगटात तेजस वेर्णेकर, अंकित शेट्टी, हेमांगी पेडणेकर, अश्विनी म्हात्रे (15 वर्षांखालील गट), व्हिन्सेंट फर्नांडिस, एड्रिक वाझ, सानी गावस, आर्या दाभोळकर (13 वर्षांखालील गट), साजन श्रेयस, सर्वांग पागी, राशेल परेरा, साईजा देसाई (11 वर्षांखालील गट), सत्यम फळ, शुभ बोरकर, दिया सावळ, जेन्सिना सिक्वेरा (9 वर्षांखालील गट), आरव प्रभुगावकर, आर्यन नाईक, स्कायला रॉड्रिग्ज, म्युरियल फर्नांडिस (7 वर्षांखालील गट) यांना बक्षीस मिळाले. व्हेटरन गटात प्रकाश इन्सुलकर व वीणा गोम्स यांना बक्षीस मिळाले.

स्पर्धेत 78 खेळाडूंनी भाग घेतला, त्यापैकी 28 मुली होत्या. आशेष केणी स्पर्धेचे मुख्य आर्बिटर, आशा शिरोडकर सहाय्यक आर्बिटर होत्या. बक्षीस वितरण बीपीएस स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष संतोष जॉर्ज, सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आशेष केणी, उपाध्यक्ष दामोदर जांबावलीकर, सचिव सुनील बाळ्ळीकर, खजिनदार दिलीप वेर्णेकर यांच्या उपस्थितीत झाले. बीपीएस क्लबतर्फे लवकरच क्लब संकुलात बुद्धिबळ प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची माहिती संतोष जॉर्ज यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT