ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी देखील आहेत भारतीय प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्यासोबत विदेशी प्रशिक्षक टॉम मुडी यांनी देखील दाखवली भारताचा प्रशिक्षक होण्याची इच्छा
Former Australian cricketer Tom Moody
Former Australian cricketer Tom MoodyDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य (Team India Coach) प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) येत्या T20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup) दुबईला पोहोचले आहेत. प्रशिक्षक म्हणून त्यांची ही शेवटची स्पर्धा असेल. त्यानंतर शास्त्री प्रशिक्षक पदावरून निवृत्त होतील. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) यांसारख्या अनेक दिग्गजांची नावे समोर येत आहेत. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्समध्ये एका परदेशी प्रशिक्षकाची नाव समोर येत आहे.

Former Australian cricketer Tom Moody
IPL 2021: ...म्हणून सोडले कर्णधारपद, विराटचे स्पष्टीकरण

एका क्रीडावाहिनीच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी (Tom Moody) यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली असून ते प्रशिक्षक पदासाठी लवकरच अर्ज करतील. सध्या, टॉम मूडी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे संचालक आहेत. याशिवाय ते श्रीलंका क्रिकेट संघाचे देखील संचालक आहेत.

कर्णधार कोहली सोबत शास्त्री यांची असेल शेवटची स्पर्धा

T20 विश्वचषक 2021: रवी शास्त्री वगळता टीम इंडियाचे इतर कोचिंग स्टाफही 7 ऑक्टोबरला यूएईला पोहोचले आहेत. दुबईमध्ये ६ दिवस क्वारंटाईनमध्ये टीम इंडिया दुबईतील चेन्नई सुपर किंग्ज हॉटेलमध्ये थांबेल. शास्त्री तेथे एका माहितीपटाच्या शूटिंगमध्ये सहभागी होतील. भारत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध टी -20 विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. विराट कोहली कर्णधार म्हणून आणि रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून टी -20 ही शेवटची स्पर्धा असणार आहे. . या मेगा इव्हेंटनंतर रवी शास्त्री प्रशिक्षक पदावरून पायउतार होतील, त्यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांना मुदत वाढवायची इच्छा नसल्याचे समजते.

Former Australian cricketer Tom Moody
श्रृंगी, संजना, झेवियर, झिदानचे जलतरणात यश

मला पाहिजे ते सर्व मी साध्य केले

रवी शास्त्री म्हणाले होते, "मला विश्वास आहे की मला पाहिजे ते सर्व मी साध्य केले आहे. नंबर 1 (कसोटी क्रिकेटमध्ये) म्हणून पाच वर्षे, ऑस्ट्रेलियात दोनदा विजय मिळवला आणि इंग्लंडमध्ये मालिका जिंकली. मी या उन्हाळ्याच्या सुरुवातीला मायकल आर्थरटनशी बोललो आणि सांगितले की कोरोना काळात ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये हरवणे आणि इंग्लंडमध्ये जिंकणे माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. इंग्लंडमध्ये आम्ही 2-1 पुढे आहोत. लॉर्ड्स आणि ओव्हलमध्ये आम्ही ज्या प्रकारे खेळलो ते विशेष होते. ”

द. आफ्रिकेचे लांस क्लूजनर सुद्धा भारतासारख्या सर्वोत्तम संघाच्या प्रशिक्षकपदासाठी काम करण्यास इच्छुक असल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com