Goa cricket team Dainik Gomantak
क्रीडा

दीडशतकवीर स्नेहलमुळे गोव्याचे पारडे जड, शेवटच्या दिवशी कठीण आव्हान

स्नेहलने नाबाद खेळीत 175 चेंडूंचा सामना करताना 18 चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 165 धावा केल्या

दैनिक गोमन्तक

पणजी ः गोव्याची फलंदाजी पहिल्या डावात कोसळली, पण दुसऱ्या डावात शनिवारी कर्णधार स्नेहल कवठणकरचे दीडशतक (नाबाद 165), तसेच सुयश प्रभुदेसाई (73) आणि एकनाथ केरकर (नाबाद 50) यांची अर्धशतके यामुळे मोठी धावसंख्या रचली. यामुळे रणजी करंडक क्रिकेट  स्पर्धेच्या एलिट ड गट सामन्यात ओडिशाविरुद्ध त्यांचे पारडे जड झाले.

गोव्याने (goa) दुसरा डाव 5 बाद 394 धावांवर घोषित करून एकंदरीत 386 धावांची आघाडी प्राप्त केली. पहिल्या डावात आठ धावांची नाममात्र आघाडी घेतलेल्या ओडिशाने (Odisha) तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद 22 धावा केल्या. सामना जिंकण्यासाठी त्यांना रविवारी सामन्याच्या चौथ्या व शेवटच्या दिवशी आणखी 365 धावांची गरज आहे. मोटेरा-अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ‘ब’ मैदानावर सामना सुरू आहे.

स्नेहलची लाजवाब खेळी

डिसेंबर महिन्यात विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट (cricket) स्पर्धेत पंजाबविरुद्ध नाबाद 148 धावांची खेळी केलेल्या स्नेहल कवठणकरने पुन्हा कर्णधारास साजेशी फलंदाजी केली. शनिवारी तोच फॉर्म पुढे नेत रणजी करंडक स्पर्धेतील सहावे शतक झळकावले. या 26 वर्षीय फलंदाजाने दोन शतकी भागीदारी केल्या, त्यामुळे गोव्याला दुसरा डाव प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हनासह घोषित करणे शक्य झाले. कालच्या 2 बाद 87 वरून पुढे खेळताना सकाळच्या सत्रात नाईट वॉचमन अमूल्य पांड्रेकर व सुयश प्रभुदेसाई यांनी तिसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. अमूल्य बाद झाल्यानंतर सुयशने स्नेहलच्या साथीत ओडिशाच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी केली.

सुयश शतक करेल असे वाटत असताना अभिषेक राऊतच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी कर्णधार सुभ्रांशू सेनापती याच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्याने 144 चेंडूंतील खेळीत नऊ चौकार व दोन षटकारांच्या साह्याने 73 धावा केल्या. शुभम रांजणे लगेच बाद झाल्यानंतर स्नेहलने पहिल्या डावात अर्धशतक केलेल्या एकनाथ केरकरच्या साथीत ओडिशाच्या गोलंदाजांना यश मिळवू न देता धावांचा ओघ वाढविला. स्नेहलने नाबाद खेळीत 175 चेंडूंचा सामना करताना 18 चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 165 धावा केल्या. एकनाथने 78 चेंडूंत चार चौकारांसह नाबाद 50 धावा केल्या.

गोवा, पहिला डाव ः 181 व दुसरा डाव ः 106.1 षटकांत 5 बाद 394 घोषित (अमूल्य पांड्रेकर 13 , सुयश प्रभुदेसाई 73 , स्नेहल कवठणकर नाबाद 165 , शुभम रांजणे ४, एकनाथ केरकर नाबाद 50, बसंत मोहंती 1-51, आशिष राय 1-69, अभिषेक राऊत 3-106).

ओडिशा, पहिला डाव ः 189 व दुसरा डाव ः 10 षटकांत बिनबाद 22 (अनुराग सारंगी नाबाद 10, शंतनू मिश्रा नाबाद 6).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT