नॉर्थईस्टचा बंगळूरवर सनसनाटी विजय

बंगळूरला जोरदार धक्का
Northeast's victory over Bangalore
Northeast's victory over BangaloreDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी ः बदली खेळाडू मैदानात उतरल्यानंतर आक्रमणात गतिमान ठरलेल्या नॉर्थईस्ट युनायटेडने आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत शुक्रवारी सनसनाटी विजय नोंदविला. माजी विजेत्या बंगळूर एफसीला त्यांनी पिछाडीवरून 2-1 फरकाने पराजित केले. सामना फातोर्डा (Fatorda) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

बदली खेळाडू ब्राझीलियन मार्सेलो परेरा याच्या असिस्टवर गोल केलेला लाल्डानमाविया राल्टे नॉर्थईस्टसाठी ‘सुपरसब’ ठरला. त्याने 80 व्या मिनिटास निर्णायक गोल केला. त्यापूर्वी, ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याने 66 व्या मिनिटास बंगळूर (Bangalore) एफसीला आघाडी मिळवून दिली. 35 वर्षीय आघाडीपटूचा हा मोसमातील आठवा गोल ठरला. मात्र नंतर नॉर्थईस्ट युनायटेडने जोरदार मुसंडी मारली. जमैकन खेळाडू देशॉर्न ब्राऊनच्या हेडिंग गोलमुळे गुवाहाटीच्या संघाने 74 व्या मिनिटास बरोबरी साधली. ब्राऊनचा हा मोसमातील सातवा गोल ठरला.

Northeast's victory over Bangalore
‘उत्पल बाबत योग्य निर्णय घेऊ’

नंतर बदली खेळाडू लाल्डानमाविया राल्टे याच्या गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडने सामन्यात आघाडी मिळविली. ब्राझीलियन खेळाडू मार्सेलो सत्तराव्या मिनिटास मैदानात उतरल्यानंतर नॉर्थईस्ट युनायटेडचा खेळ जास्तच धारदार झाला. बंगळूरच्या खेळाडूंमधून चेंडूसह मुसंडी मारलेला मार्सेलो विजयी गोलचा शिल्पकार ठरला. त्याने चेंडूसह गोलक्षेत्रात धडक मारली आणि प्रतिस्पर्धी गोलरक्षक लारा शर्मा याला चकवा दिला, नंतर योग्य ‘फिनिशिंग’ करण्याचे काम राल्टे याने चोख बजावले.

Northeast's victory over Bangalore
रांजणेसह गोव्याचे गोलंदाज प्रभावी, ओडिशाची आघाडी आठ धावांपुरती

बंगळूरला जोरदार धक्का

नॉर्थईस्ट युनायटेडचा हा स्पर्धेतील अवघा तिसरा विजय ठरला. 18 लढतीनंतर त्यांचे आता 13 गुण झाले असून ईस्ट बंगालला मागे टाकून खालिद जमिल यांच्या मार्गदर्शनाखालील संघ आता दहाव्या स्थानी आला आहे. आयएसएलमध्ये 2022 मध्ये त्यांनी नोंदविलेला हा पहिलाच विजय आहे. अनपेक्षित पराभवामुळे बंगळूरचे मोठे नुकसान झाले. त्यांना सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. सहाव्या पराभवामुळे त्यांचे 17 लढतीनंतर 23 गुण आणि सहावा क्रमांक कायम राहिला. पराभवामुळे प्ले-ऑफ फेरी गाठण्यासाठी इच्छुक असलेल्या बंगळूरला मोठा धक्का बसला. त्यांच्यासाठी आता बाकी तीन सामने खूप महत्त्वाचे असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com