Goa cricket Dainik Gomantak
क्रीडा

Woman T20: गोव्याची गुजरातवर चार विकेट राखून मात

शिखा, इब्तिसामची निर्णायक भागीदारी विजय नोंदविला

दैनिक गोमन्तक

पणजी: कर्णधार शिखा पांडे आणि सलामीची इब्तिसाम शेख यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली 73 धावांची भागीदारी गोव्यासाठी निर्णायक ठरली. त्या बळावर त्यांनी सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुजरातवर चार विकेट आणि एक चेंडू राखून मात केली.

(Goa cricket team beat Gujarat by Women's T20 Cricket Tournament)

आसाममधील अमिनगाव क्रिकेट मैदानावर रविवारी गोव्याच्या महिला संघाने सलग दुसरा विजय नोंदविला. गोव्यासमोर विजयासाठी 107 धावांचे आव्हान होते. त्यापूर्वी गोव्याने गुजरातला 4 बाद 106 धावांत रोखले होते. गोव्याचा स्पर्धेतील पाचवा सामना अरुणाचल प्रदेशविरुद्ध मंगळवारी (ता. 18) होईल.

शिखा (47 धावा, 36 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार) व इब्तिसाम ( 32 धावा, 49 चेंडू, 2 चौकार) यांनी 11.2 षटके किल्ला लढवत गोव्याला विजयाच्या दिशेने नेले, पण अचानक घसरगुंडी उडाली. विजयासाठी 16 धावांची गरज असताना शिखा 17 व्या षटकात बाद झाली, त्याच षटकात दोन चेंडूनंतर इब्तिसामही माघारी परतली. लगेच तेजस्विनी दुर्गडही बाद झाल्यानंतर गोव्याची 17.4 षटकांत 5 बाद 96 अशी स्थिती झाली. अखेरीस निकिता मळीक व श्रेया परब यांनी एक चेंडू राखून विजय साकारला.

संक्षिप्त धावफलक

गुजरात: 20 षटकांत 4 बाद 106 (हनी पटेल 28, सिमरन 34, शिखा पांडे 4-0-19-0, निकिता मळीक 2-0-11-0, मेताली गवंडर 2-0-9-0, सुनंदा येत्रेकर 4-0-19-1, पूर्वा भाईडकर 3-0-19-1, तेजस्विनी दुर्गड 4-0-17-1, तनया नाईक 1-0-10-0) पराभूत वि. गोवा : 19.5 षटकांत 6 बाद 110 (इब्तिसाम शेख 32, संजुला नाईक 0, सुनंदा येत्रेकर 7, शिखा पांडे 47, तेजस्विनी दुर्गड 3, विनवी गुरव 5, निकिता मळीक नाबाद 6, श्रेया परब नाबाद 4, मुस्कान वासावा 2-17, कृतिकाबेन 1-13, हिरलबेन सोलंकी 1-38, स्तुती जैन 2-25).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

SCROLL FOR NEXT