Goa Cricket : K. Bhaskar Pillai Dainik Gomantak
क्रीडा

Goa Cricket: प्रशिक्षकपदाची सूत्रे भास्कर यांनी स्वीकारली

Goa Cricket: पाहुणा क्रिकेटपटू जागेसाठी चौघांची चाचणी, रांजणेची निवड जवळपास नक्की

किशोर पेटकर

पणजीः गोवा क्रिकेट असोसिएशनने (Goa Cricket Association) आगामी मोसमासाठी गोव्याच्या रणजी-सीनियर क्रिकेट संघ प्रशिक्षकपदी नियुक्त केलेले दिल्लीचे माजी फलंदाज कृष्णन पिल्लई (के. पी.) भास्कर (K. Bhaskar Pillai) यांनी शुक्रवारी पदाची सूत्रे स्वीकारली. शनिवारी त्यांची संभाव्य संघासोबत बैठक होईल, अशी माहिती जीसीए सचिव विपुल फडके (Vipul Fadke)यांनी दिली. ‘‘भास्कर यांनी आज कार्यभार स्वीकारला. उद्या सकाळी त्यांची संभाव्य संघासमेवत पहिली अधिकृत बैठक होईल,’’ असे फडके यांनी सांगितले. जीसीएने गतमोसमातील पाहुणा क्रिकेटपटू यष्टिरक्षक एकनाथ केरकर याला संघात कायम राखले आहे. संघात आणखी दोन पाहुणे खेळाडू निवडले जातील. त्यापैकी मुंबईचा अष्टपैलू शुभम रांजणे याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) संघ बदलासाठी ना हरकत दाखला (एनओसी) सादर केला आहे. त्याची निवड जवळपास पक्की असल्याचे फडके यांनी नमूद केले. वेगवान गोलंदाजासाठी चार गोलंदाज शर्यतीत असून दिल्लीचे सुबोध भाटी व विकास टोकस, हरियानाचा दीपक पुनिया, तसेच विदर्भाचा श्रीकांत वाघ यांची शुक्रवारी यो-यो आणि स्नायू तंदुरुस्ती चाचणी झाल्याची माहिती फडके यांनी दिली.

क्रिकेटपटू या नात्याने निवृत्त झाल्यानंतर भास्कर 2007 पासून प्रशिक्षणात कार्यरत आहेत. दशकभरापूर्वी ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) लेव्हल बी प्रशिक्षक बनले. त्यांनी आतापर्यंत दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, त्रिपुराच्या रणजी संघाला मार्गदर्शन केले आहे. ते प्रशिक्षक असताना उत्तराखंडने 2018-19 मोसमात रणजी पदार्पणात उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. भास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीने 2017-18 मोसमात सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धा जिंकली, तर रणजी स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्यांनी फलंदाजी सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

Fish Price Hike: मासे खाणं महागलं... सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT