Goa Chess: Successful Blitz chess players (from left) Nitish Belurkar, Reuben Colaco, Devesh Naik.
Goa Chess: Successful Blitz chess players (from left) Nitish Belurkar, Reuben Colaco, Devesh Naik. Dainik Gomantak
क्रीडा

Goa Chess: ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळात नीतिश विजेता

दैनिक गोमन्तक

पणजी : क्रीडा भारती गोवा (Kreeda Bharati Goa) यांनी फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेच्या (Ponda Taluka Chess Association) सहकार्याने घेतलेल्या अखिल गोवा खुल्या बिल्ट्झ बुद्धिबळ (All Goa Open Blitz Chess) स्पर्धेत नीतिश बेलुरकर (Nitish Belurkar) विजेता ठरला. गोवा बुद्धिबळ संघटनेची (Goa Chess Association) मान्यता असलेली स्पर्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर झाली. स्पर्धेत राज्यातील 165 बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. नीतिशने अव्वल कामगिरी नोंदविताना सर्व नऊही डाव जिंकले. रूबेन कुलासो व देवेश नाईक यांनी प्रत्येकी 7.5 गुण नोंदवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. पार्थ साळवी, वसंत नाईक, ऋत्विज परब, उत्कर्ष गणपुले, साईश फोंडेकर, अथर्व काटकर, चैतन्य गावकर, स्वेरा ब्रागांसा, मंदार लाड, श्रीलक्ष्मी कामत, आदित्य तांबा, प्रज्वल हेदे यांना अनुक्रमे चौथा ते पंधरावा क्रमांक मिळाला.

आदित्य दुबळे, म्युरियल फर्नांडिस (7 वर्षांखालील), सारस पोवार, रुद्र उसकईकर (9 वर्षांखालील), ह्रदय मोरजकर, ऋद्धी गावडे (11 वर्षांखालील), सागर शेट्टी, आर्या दाभोळकर (13 वर्षांखालील) यांना वयोगटात बक्षीस मिळाले. विल्सन क्रूझ यांनी स्पर्धेत मुख्य आर्बिटरचे काम पाहिले. फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सागर साकोर्डेकर, सचिव अमोघ नमशीकर, सदस्य जयवंत हम्मणावर, आनंद कुर्टीकर, क्रीडा भारती गोवाचे सुदेश ठाकूर, कर्नल मंगेश दाणी, संतोष देसाई, अनू मोडक यांनी स्पर्धा आयोजनात वाटा उचलला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

SCROLL FOR NEXT