अनुराचे ‘टॉप 50’ लक्ष्य; राज्यातील बॅडमिंटनपटूंचा उत्साह दुणावला !

इनडोअर स्टेडियम (Indoor Stadium) खुली झाल्यानंतर सरावाची संधी मिळाल्याने गोव्यातील बॅडमिंटनपटूंचा उत्साह दुणावला आहे.
Anura Prabhudesai
Anura PrabhudesaiDainik Gomantak

पणजी: इनडोअर स्टेडियम (Indoor Stadium) खुली झाल्यानंतर सरावाची संधी मिळाल्याने गोव्यातील बॅडमिंटनपटूंचा उत्साह दुणावला आहे. आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू अनुरा प्रभुदेसाई (Anura Prabhudesai ) हिने आगामी मोसमात चांगल्या कामगिरीसह पहिल्या पन्नास जणींत स्थान मिळविण्याचे लक्ष्य बाळगले आहे.

कोविड-19 (Covid 19) निर्बंध राज्य सरकारने शिथिल केल्यानंतर गतआठवड्यात इनडोअर स्टेडियम क्रीडापटूंना सराव-खेळण्यासाठी खुली झाली. त्यानंतर कांपाल-पणजी, नावेली, फोंडा येथील इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटनपटूंनी सरावावर भर दिला आहे. कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये सराव केल्यानंतर अनुरा हिने सांगितले, की ‘‘जागतिक मानांकनात पहिल्या पन्नास जणींत स्थान मिळविण्याचे माझे ध्येय आहे. यापूर्वी मी सर्वोत्तम 101 क्रमांकापर्यंत मजल मारली होती. सारं काही पूर्वपदावर येण्याची आशा आहे.

Anura Prabhudesai
Euro 2020 : ऑलिंपिकनंतर आता युरो कपवर देखील कोरोनाचे सावट

कोविड कालखंडानंतर अधिक भक्कमपणे खेळण्याचे उद्दिष्ट्य आहे.’’ जागतिक मानांकनात सध्या अनुरा 112व्या स्थानी आहे. कोविड-19 मुळे तिला दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर खेळता आलेले नाही. लॉकडाऊनच्या कालावधीत आपण घरीच सराव करण्यावर भर दिला. त्यादरम्यान कमजोर बाबींवर मेहनत घेण्यास, तसेच प्रगती साधण्यावर भर दिल्याचे फोंडा येथील 22 वर्षीय अनुराने सांगितले.

Anura Prabhudesai
युरो कप फुटबॉल स्पर्धेचा थरार 12 जूनपसून रंगणार

‘शटल’ उंच उडू दे : महाजन

कोविड-19 परिस्थिती पुन्हा उद्‍भवू नये आणि गोव्यातील (Goa) बॅडमिंटनमध्ये ‘शटल’ पुन्हा उंच उडावे अशी अपेक्षा गोव्याचे प्रमुख बॅडमिंटनपटू शर्मद महाजन यांनी व्यक्त केली. ते नावेली येथील मनोहर पर्रीकर बहुउद्देशीय इनडोअर स्टेडियममध्ये युवा बॅडमिंटनपटूंना मार्गदर्शन करतात. ‘‘आरोग्यदायी समाज जीवनात केवळ खेळामुळेच हास्य आणि आनंद येऊ शकते. पुन्हा आमच्यावर कठोर परिस्थितीतून जाण्याची पाळी येऊ नये अशी प्रार्थना करतो,’’ असे शर्मद यांनी सांगितले. लॉकडाऊन बॅडमिंटनपटूंसाठी खूपच आव्हानात्मक ठरले, असे मत त्यांनी व्यक्त केले. लॉकडाऊनच्या कालावधीत इनडोअर स्टेडियममध्ये जाऊन सराव करणे शक्य नव्हते, त्यामुळे घरातच जागा शोधून बॅडमिंटनशी नाते कायम राखावे लागले. थोडेफार सायकलिंग करून शारीरिक तंदुरुस्तीवर भर द्यावा लागला, असे महाजन यांनी नमूद केले.

‘‘लॉकडाऊनच्या कालावधीत मी पहाटे पाच वाजता उठून सुमारे चार किलोमीटर धावायचो. त्यामुळे शरीर गतिमान राखणे शक्य झाले. संध्याकाळी व्यायाम सत्रामुळे स्नायू कार्यरत राखता आले. आता पुन्हा बॅडमिंटन कोर्टवर उतरता आल्यामुळे खूप सुखावलो आहे.’’

- महंमद सादिक अत्तार

राज्य मानांकन बॅडमिंटनपटू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com