Tokyo Olympic : खेळाडू विजयानंतर पदक का चावतात ? जाणून घ्या

भारताचे (India) पथकही या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे.
Tokyo Olympics
Tokyo OlympicsDainik Gomantak
Published on
Updated on

23 जुलैपासून टोकियोत ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धांचा शुभारंभ होत आहे. जगातील सर्व देशांच्या खेळाडूंनी या खेळाच्या महाकुंभासाठी तयारीही पूर्ण केली आहे. भारताचे (India) पथकही या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर खेळाडू अनेकदा त्यांचे पदक चावताना आपण पाहिलं आहे. यामागे एक विशेष असं कारण आहे.

जाणून घ्या पदक चावणयाचे कारण..

पदक जिंकल्यानंतर खेळाडू ते का चावतात यामागे एक विशेष कारण आहे. सीएनएनच्या अहवालानुसार, खेळाडू असे करतात कारण सोने इतर धातूपेक्षा नरम असते. हे खेळाडू पदक तोंडामध्ये दाबून ते सोन्याचे आहे किंवा नाही हे निश्चित करतात. पण त्या व्यतरिक्त अनेकदा खेळाड़ू फोटो काढण्यासाठी बे सोन्याचे पदक चावतात. त्याचबरोबर अनेक फोटोग्राफर त्यांना पदक चावण्यास सांगतात. हे पदक चावल्यानंतर या पदकावर खेळाडूंच्या दातांची खूण उमटते. प्रत्येक खेळाडू आजकाल विजय संपादन केल्यानंतर पदके चावतात. हे मुख्यत: केवळ फोटो काढण्यासाठी केले जाते. मात्र आजकालच्या नवोदित खेळाडूंना पदक चावण्याच्या प्रथेविषयी कल्पना असू शकत नसेल.

Tokyo Olympics
Tokyo Olympics: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंचे वाढविले मनोबल

नवी मार्गदर्शक तत्वे यंदाच्या ऑलिम्पिकबाबत

कोरोनाच्या पाश्वभूमीवर यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्व विजेत्या खेळाडूंना मास्क घालूनच पदके स्वीकारावे लागणार आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर एकत्रित फोटो काढण्यासाठी आयोजकांद्वारे मनाई केली आहे. तसेच अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समीतीने नवी मार्गदर्शक तत्वे आखली आहेत. त्यानुसार तिन्ही पदके संपदित करणाऱ्या विजेत्या खेळाडूंना नियमित वेळेपेक्षा अधिक अंतर ठेवता येणार नाही. मास्क घातल्याशिवाय खेळाडूंना व्यासपीठावर उभे राहण्यास मनाई असून आपले पदक त्यांना स्वत: हूनचं घालावे लागणार आहे. याआगोदर उद्घाटन सोहळ्याला 10 हजार अतिमहत्त्वाच्या अतिथिनी निमंत्रित करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com