Goa Chess Association
Goa Chess Association Dainik Gomantak
क्रीडा

Goa Chess: निवडणुक प्रक्रियेत बुद्धिबळ महासंघाचा हस्तक्षेप?

किशोर पेटकर

पणजी ः गोवा बुद्धिबळ संघटनेची (Goa Chess Asociation) निवडणूक प्रक्रिया, तसेच कार्यकारी समिती (Executive Committee) बिनविरोध ठरणे बेकायदा असल्याचा आरोप संलग्न बारापैकी सात तालुका बुद्धिबळ संघटनांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाकडे (All India Chess Federation) दाद मागण्याचे सात तालुका संघटनांनी ठरविले आहे. त्यामुळे राज्य बुद्धिबळात महासंघाचा हस्तक्षेप अपेक्षित आहे. गोवा बुद्धिबळातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रियेतील कथित गडबडीप्रकरणी न्यायालयात जाण्याऐवजी अगोदर महासंघाचा दरवाजा ठोठावण्याचे सात तालुका बुद्धिबळ संघटनांनी ठरविले आहे. संयुक्त पत्र मिळाल्यानंतर महासंघाकडून गोव्यातील बुद्धिबळप्रकरणी चौकशी अपेक्षित आहे आणि कदाचित राज्य बुद्धिबळ संघटनेचा कारभार आणि निवडणूक प्रक्रिया अभ्यासण्यासाठी महासंघाकडून अस्थायी समितीही नियुक्त होऊ शकते. ‘‘आम्ही महासंघाच्या संपर्कात आहोत. महासंघाचे सचिव अनुकूल आहेत. आता आम्हाला महासंघाकडूनच दिलासा मिळू शकतो. न्यायालयात जाण्यापूर्वी आम्ही महासंघाशी सल्लामसलत करण्याचे ठरविले आहे,’’ असे एका तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

महासंघाकडे जाण्यास कारण...

सात तालुका संघटना अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाकडे जाण्यासाठी समर्पक कारण आहे. गोवा बुद्धिबळ संघटनेचे मावळते सचिव किशोर बांदेकर आणि महासंघाचे सचिव भारतसिंग चौहान यांच्यातील संबंध चांगले नाहीत. महासंघाच्या मागील निवडणुकीत बांदेकर यांनी खजिनदारपदाची निवडणूक चौहान यांच्या गटाविरोधात लढविली होती आणि त्यावेळी बांदेकर यांना पराभव पत्करावा लागला होता. साहजिकच भविष्यातील विचार करता, महासंघाला गोवा बुद्धिबळ संघटनेतील सात तालुका संघटना महत्त्वाचा वाटत असून या कारणास्तव महासंघ गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेचा अहवाल मागवून हस्तक्षेपत करू शकेल, असे सूत्राने नमूद केले. बांदेकर व त्यांच्या समर्थकांनी फारच कडक भूमिका घेत महासंघाला जुमानले नाही, तसेच निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास महासंघ गोवा बुद्धिबळ संघटनेची संलग्नता तात्पुरती निलंबित करू शकेल, तसे झाल्यास राज्यातील बुद्धिबळपटूंचे फार मोठे नुकसान होईल, असे मत सूत्राने व्यक्त केले.

विरोधकांचे आरोप तथ्यहीन ः बांदेकर

तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मावळते सचिव किशोर बांदेकर यांच्यावर आर्थिक बाबतीत आरोप केला होता. गतवर्षी ऑनलाईन ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा घेताना संघटनेच्या पैशांची उधळपट्टी केली होती. निधी अकारण वापरल्याबद्दल कार्यकारी समिती बैठकीत अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी बांदेकर यांना सुनावले होते, असा दावा कांदोळकर यांनी केला होता. त्यास उत्तर देताना बांदेकर यांनी गुरुवारी सर्व आरोप तथ्यहीन आणि बिनबुडाचे असल्याचे सांगितले. ‘‘मागील आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकास आमसभेनेही मंजुरी दिलेली आहे. कार्यकारी समिती बैठकीत त्याविरुद्ध कोणी आक्षेप घेतला नाही. मावळत्या समितीतील खजिनदार आता दुसऱ्या गटासोबत आहेत, तेच सत्य सांगू शकतील. आरोप आताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहेत, त्याचे कारण वेगळेच असूनकर्ता करविता भलताच असल्याचे बांदेकर यांनी नमूद केले. मनोहर पर्रीकर यांच्या नावाने स्पर्धा असल्याने यशस्वी स्पर्धकांना पदके देण्याचे ठरले. तसेच मुख्य ग्रँडमास्टर स्पर्धेबरोबर आणखी दोन उपस्पर्धा ऑनलाईन पद्धतीने झाल्या. त्यामुळे अंदाजपत्रक किंचित वाढले, पण निधी अकारण वाया घालवला नाही, असे बांदेकर यांनी ठासून सांगितले. गोव्यातील बुद्धिबळासाठी आपण वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च केलेले आहेत, त्यामुळे उधळपट्टीचा आरोप विरोधक नैराश्यपोटी करत असल्याचेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Live News: पिर्ला केपे चिरे खाणीवर धाड; नऊ यंत्रे जप्त

Morjim: लाईट नाही म्हणून मध्यरात्री केला आमदाराला फोन; जीत आरोलकरांची थेट पोलिसांत तक्रार

SCROLL FOR NEXT