Goa Chess: Kishor Bandekar
Goa Chess: Kishor Bandekar Dainik Gomantak
क्रीडा

Goa Chess: ‘एक्झिट’ घेण्याच्या तयारीत बांदेकर

किशोर पेटकर

पणजीः सुमारे तपभर गोवा बुद्धिबळ संघटनेत (Goa Chess Association) विविध पदावर काम केल्यानंतर आता मावळते सचिव किशोर बांदेकर (Kishor Bandekar) यांनी कार्यकारी समितीचा (Executive Committee) निरोप घेण्याच्या विचारात आहेत. संघटनेची आगामी निवडणूक (Election) न लढविण्याबाबत संकेत खुद्द बांदेकर यांनी दिले आहे. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे खजिनदारपद यापूर्वी भूषविलेले वास्को येथील बांदेकर गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2018 साली काब्राल व बांदेकर यांच्या पुढाकाराने गोव्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा झाली, नंतर 2019 स्पर्धेत ही स्पर्धा दुसऱ्यांदा झाली. 2020 मध्ये महामारीमुळे स्पर्धा होऊ शकली नाही. गोवा बुद्धिबळ संघटनेच्या घटनेनुसार, बांदेकर यांची सचिवपदाची मुदत संपली आहे, त्यामुळे त्यांनी खजिनदारपदासाठी इच्छुकता व्यक्त केली होती. मात्र त्यांनी आता विचार बदलल्याचे जाणवते.

‘‘मी आता वयाची साठी ओलांडलेली आहे. सचिवपद घेऊ शकत नाही. आता पडद्यामागील खुर्चीवर बसण्याची वेळ आली आहे. गोवा बुद्धिबळ संघटनेचा निरोप घेतल्यानंतर राज्यातील बुद्धिबळाच्या उत्कर्षासाठी पूर्णपणे वाहून घेणार आहे, मी पूर्वीप्रमाणे समितीत सक्रिय नसेन,’’ असे बांदेकर यांनी सांगितले. गोवा बुद्धिबळ संघटनेची निवडणूक येत्या 22 ऑगस्ट रोजी नियोजित आहे. त्यामुळे गुरुवारपासून (ता. 29) उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. पाच ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारले जातील आणि त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. संघटनेची नवी कार्यकारी समिती 2021-2025 या कालावधीसाठी असेल. मावळत्या कार्यकारी समितीचा कालावधी 30 जून रोजी संपला आहे, पण कोविड-19 निर्बंधामुळे निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली.

अनुभवी बुद्धिबळ प्रशासक

बांदेकर हे गोवा बुद्धिबळातील अनुभवी प्रशासक आहेत. 2013-2017 आणि 2017-2021 अशा दोन मुदतीसाठी सचिवपद भूषविलेले बांदेकर यांनी यापूर्वी राज्य संघटनेत सदस्य, उपाध्यक्ष, खजिनदार आदी पदे भूषविली आहेत. बांदेकर यांच्या कार्यकाळात 2018 पासून गोव्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खुली ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा सुरू झाली. 2017 ते 2020 या कालावधीसाठी ते अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे खजिनदार होते, मात्र यावर्षी जानेवारीत झालेल्या महासंघाच्या निवडणुकीत खजिनदारपद त्यांना अवघ्या चार मतांच्या \फरकाने हुकले. ते फिडेचे मान्यताप्राप्त आर्बिटर असून राष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळपटू या नात्याने गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ते मुरगाव तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT