Goa Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

रांजणेसह गोव्याचे गोलंदाज प्रभावी, ओडिशाची आघाडी आठ धावांपुरती

दैनिक गोमन्तक

पणजी ः गोवा क्रिकेट संघातील मुंबईकर ‘पाहुणा’ शुभम रांजणे याने रणजी करंडक कारकिर्दीत प्रथमच डावात पाच गडी टिपले, त्याच्यासह इतर वेगवान गोलंदाजांनीही प्रभावी मारा केला. त्यामुळे एलिट ड गट सामन्यात ओडिशाची आघाडी आठ धावांपुरती मर्यादित राहिली. नंतर दुसऱ्या डावात गोव्याने 2 बाद 87 धावा करून एकंदरीत 79 धावांचे आधिक्य मिळवले.

मोटेरा-अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमच्या ‘ब’ मैदानावर सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुसऱ्या सत्रात ओडिशाचा पहिला डाव कालच्या 3 बाद 23 वरून 189 धावांत आटोपला. शुभम रांजणेने 49 धावांत 5 गडी बाद केले. 

पहिल्या डावात 181 धावा केलेल्या गोव्याला (goa) दुसऱ्या डावात सुमीरन आमोणकर (33) व अमोघ देसाई (42) यांनी 76 धावांची दमदार सलामी दिली. मात्र याच धावसंख्येवर दोघेही बाद झाल्यामुळे गोव्याचे लागोपाठ दोन झटके बसले. नंतर अमूल पांड्रेकर व सुयश प्रभुदेसाई यांनी बाकी 3.3 षटके सावधपणे खेळून काढली.

ओडिशाचा (Odisha) प्रतिकार गोव्याच्या वेगवान मध्यमगती गोलंदाजांनी ओडिशाला ठराविक अंतराने धक्के दिले, मात्र त्यांचा यष्टिरक्षक-फलंदाज राजेश धुपर याने चिवट प्रतिकार केल्यामुळे ओडिशाला नाममात्र आघाडी मिळाली. धुपर 71 धावांवर नाबाद राहिला. त्याने 107 चेंडूंतील खेळीत सात चौकार व एक षटकार मारला. त्याने अभिषेक राऊत याच्या साथीत सहाव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केल्यामुळे सकाळच्या सत्रात ओडिशाला 5 बाद 54 वरून धावांचे शतक पार करता आले. सुयश प्रभुदेसाईने अभिषेकला बाद करून जोडी फोडली. नंतर धुपरने आठव्या विकेटसाठी राजेश मोहंती याच्यासमवेत 44 धावांची भागीदारी करत ओडिशाला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.

रांजणेने दोघा फलंदाजांना झटपट बाद केल्यामुळे ओडिशाची 9 बाद 167 अशी स्थिती झाली. मात्र धुपरने शेवटचा गडी आशिष राय याच्यासमवेत 22 धावांची भागीदारी करून संघाला गोव्याची धावसंख्या पार करण्यास मोलाची मदत केली.

रांजणेची सर्वोत्तम कामगिरी

मुंबईतर्फे (Mumbai) यापूर्वी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत 2016 ते 2020 या कालावधीत 12 सामने खेळलेल्या 27 वर्षीय अष्टपैलू शुभम रांजणेने शुक्रवारी शानदार मारा केला. त्याने 14 डावात पाच गडी बाद केले होते व 62 धावांत 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. सामन्याच्या पहिल्या दिवशी एका फलंदाजास बाद केलेल्या शुभमने शुक्रवारी आणखी चार गडी बाद करून ओडिशाचा संघ मोठी धावसंख्या रचणार नाही याची दक्षता घेतली. त्याने बसंत मोहंती याला यष्टिरक्षक एकनाथ केरकर याच्याकरवी झेलबाद करून डावात प्रथमच निम्मा संघ बाद करण्याची किमया साधली.

गोवा, पहिला डाव ः 181 व दुसरा डाव ः 32 षटकांत 2 बाद 87 (सुमीरन आमोणकर 33, अमोघ देसाई 42, अमूल्य पांड्रेकर नाबाद 5, सुयश प्रभुदेसाई नाबाद 6, बसंत मोहंती 1-21, अभिषेक राऊत 1-10).

ओडिशा, पहिला डाव ः 56 षटकांत सर्वबाद 189 (सुभ्रांशू सेनापती 29 , राजेश धुपर नाबाद 71, अभिषेक राऊत 29, देबब्रत प्रधान 13, राजेश मोहंती 18, श्रीकांत वाघ 15-5-35-1, लक्षय गर्ग 16-2-48-2, दर्शन मिसाळ 3-1-8-1, शुभम रांजणे 15-2-49-5, सुयश प्रभुदेसाई 4-0-24-1, अमूल्य पांड्रेकर 1-0-7-0, अमित यादव 2-0-12-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT