दमदार सलामी, अचूक गोलंदाजीमुळे गोव्याचा (Goa) पाच विकेटने विजयी Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याचे आसामवर वर्चस्व

दमदार सलामी, अचूक गोलंदाजीमुळे गोव्याचा (Goa) पाच विकेटने विजयी, एकनाथचे नाबाद अर्धशतक

दैनिक गोमन्तक

पणजी: एकनाथ केरकरचे संयमी नाबाद अर्धशतक, कर्णधार स्नेहल कवठणकरची (Snehal Kavthankar) शानदार फलंदाजी, तसेच गोलंदाजांच्या धारधार मारा या बळावर गोव्याने (Goa) विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट (Cricket) स्पर्धेत बुधवारी विजयी सलामी दिली. त्यांनी एलिट ई गटात आसामवर (Assam) पाच विकेट आणि नऊ चेंडू राखून सहज मात केली. हा सामना झारखंडमधील रांची येथे झाला.

आसामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण गोव्याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे त्यांना मोठी धावसंख्या रचता आली नाही. वेगवान लक्षय गर्ग आणि डावखुरा फिरकीपटू अमूल्य पांड्रेकर यांनी प्रत्येकी तीन विकेट टिपत आसामला ९ बाद २१५ असे रोखले. नंतर एकनाथच्या १०१ चेंडूंतील नाबाद ६१ धावा, तसेच सलामीला आलेल्या स्नेहल कवठणकर याच्या ४९ धावांच्या बळावर गोव्याने ४८.३ षटकांत ५ बाद २१९ धावा करून सामना जिंकला.

स्नेहल व आदित्य कौशिक (२३) यांनी गोव्याला ५१ धावांची सलामी दिली. आदित्यला रोशन आलम याने पायचीत बाद केल्यानंतर अर्धशतकास एक धाव हवी असताना स्नेहलला रियान पराग याने त्रिफाळाचीत बाद केले. स्नेहलने ५५ चेंडूंतील खेळीत ५ चौकार मारले. शुभम रांजणे (८) याला राहुल सिंगने कुणाल सैकिया याच्याकरवी यष्टिचीत केल्यामुळे गोव्याची स्थिती ३ बाद ९६ अशी झाली. त्यानंतर अतिशय सावधपणे फलंदाजी करताना एकनाथने सुयश प्रभुदेसाई (३७) याच्या साथीत गोव्याला सावरले. त्यांनी चौथ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. सुयशला रोशन आलमने बाद केल्यानंतर एकनाथला डावखुऱ्या दर्शन मिसाळने (३७) समर्थ साथ दिली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करत गोव्याचा विजय पक्का केला. सामना जिंकण्यासाठी चार धावा हव्या असताना दर्शन बाद झाला, पण तोपर्यंत गोव्याची स्पर्धेतील विजयी सलामी पक्की झाली होती. एकनाथने षटकार खेचत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT