GLENN MAXWELL BROKE MANY RECORDS IN ICC CRICKET WORLD CUP 2023. DAINIK GOMANTAK
क्रीडा

GLENN MAXWELL चा 'बिग शो'; धुव्वादार फटाकेबाजीसह उडवला विक्रमांचा धुरळा

GLENN MAXWELL २०१ धावांची खेळी करून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत 21 चौकार आणि 10 षटकार मारले. धावांचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी खेळली.

Ashutosh Masgaunde

GLENN MAXWELL BROKE MANY RECORDS IN ICC CRICKET WORLD CUP 2023:

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने इतिहास रचला.

ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध 201 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर त्याने आपल्या संघाला विजयापर्यंत नेलेच पण अनेक विक्रमही मोडीत काढले.

मॅक्सेवलने या खेळीने आपल्या संघाला स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तर पोहचवलेच पण आपल्याला 'बिग शो' का म्हटले जाते हेसुद्धा त्याने दाखवून दिले.

एकदिवसीय क्रिकेटमधील धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठी खेळी:

ग्लेन मॅक्सवेल २०१ धावांची खेळी करून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत 21 चौकार आणि 10 षटकार मारले.

धावांचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने फखर जमानला (193 धावा) मागे टाकले.

  • 201* – ग्लेन मॅक्सवेल (AUS) विरुद्ध AFG, मुंबई, 2023 WC

  • 193 – फखर जमान (PAK) विरुद्ध SA, जोहान्सबर्ग, 2021

  • 185* – शेन वॉटसन (AUS) विरुद्ध BAN, मिरपूर, 2011

  • 183* – एमएस धोनी (IND) विरुद्ध SL, जयपूर, 2005

  • 183 – विराट कोहली (IND) विरुद्ध PAK, मीरपूर, 2012

एकदिवसीय विश्वचषकातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या:

ग्लेन मॅक्सवेल एकदिवसीय विश्वचषकात द्विशतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला. मॅक्सवेलच्या आधी मार्टिन गुप्टिल (२३७*) आणि ख्रिस गेल (२१५) यांनीही अशीच कामगिरी केली होती.

237* – मार्टिन गुप्टिल (NZ) विरुद्ध WI, वेलिंग्टन, 2015

215 – ख्रिस गेल (WI) विरुद्ध , ZIM कॅनबेरा, 2015

201* – ग्लेन मॅक्सवेल (AUS) विरुद्ध AFG, मुंबई WS, 2023

188* – गॅरी कर्स्टन (SA) विरुद्ध UAE, रावळपिंडी, 1996

183 - सौरव गांगुली (IND) विरुद्ध SL, टॉंटन, 1999

याशिवाय ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय सामन्यात पहिले द्विशतक झळकावणारा फलंदाज ठरला.

आता एकदिवसीय क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाकडून सर्वात मोठ्या खेळीचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर नोंदवला गेला आहे.

ग्लेन मॅक्सवेलपूर्वी शेन वॉटसनच्या नावावर १८५ धावा करण्याचा विक्रम होता.

एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठी खेळी

201* – ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध AFG, मुंबई, 2023 WC

185* – शेन वॉटसन विरुद्ध BAN, मीरपूर, 2011

181* – मॅथ्यू हेडन विरुद्ध NZ, हॅमिल्टन, 2007

179 – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध PAK, अ‍ॅडलेड, 2017

178 – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध AFG, पर्थ, 2015 WC

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US War: इराणच्या 'स्वदेशी' शक्तीपुढे सुपरपॉवरचा थरकाप! अमेरिकेचे 850 कोटींचे F-35 फायटर जमीनदोस्त; नव्या एअर-डिफेन्स सिस्टिमने दाखवली ताकद

Leopard Attack: ..पुन्हा घुमली बिबट्याची डरकाळी! कामुर्लीत वासराचा फडशा; परिसरात भीतीचे वातावरण

Fight Video: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! डेव्हिड वॉर्नर आणि मोईन अलीमध्ये जुंपली, पाहा व्हिडिओ

Betki: सफर गोव्याची! ‘झील सावई, बेतकी आवय’; थंड हवा आणि सुंदर मंदिरांनी सजलेले 'बेतकी'

धोकादायक वळण अन् चालकाची मस्ती! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT