

कामुर्ली: कामुर्ली गावात बुधवारी रात्री बिबट्याने एका वासराचा बळी घेतल्याची घटना उघडकीस आली असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
येथील स्थानिक रहिवासी यशदीप नाईक यांच्या मालकीचे वासरू घराशेजारील शेतात बांधलेले होते. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत बिबट्याने वासरावर अचानक हल्ला करून त्याला ठार केले. गुरुवारी सकाळी शेतात गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच परिसरात बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
वनविभागाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लवकरच पिंजरा लावण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेर जाण्यास नागरिक टाळत आहेत. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.