Glenn Maxwell
Glenn Maxwell  Dainik Gomantak
क्रीडा

Australia: मित्राच्या बर्थडे पार्टीत मोडून घेतला पाय, 'हा' ऑस्ट्रेलियन खेळाडू तीन महिने क्रिकेटला मुकणार

गोमन्तक डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचा (Glenn Maxwell Accident) मेलबर्नमध्ये मित्राच्या 50 व्या बर्थडे पार्टीत अपघात झाला. या अपघातात त्याचा पाय मोडला असून, किमान तीन महिने तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे. ग्लेन मॅक्सवेल या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. शनिवारी झालेल्या अपघातात मॅक्सवेलच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

(Glenn Maxwell breaks leg after freak accident at birthday party in Melbourne)

रविवारी 34 वर्षीय मॅक्सवेलवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शनिवारी मॅक्सवेल आणि त्याचे मित्र घरामागील अंगणात धावत असताना अपघात झाला. दोघेही घसरून पडले. दरम्यान, दोघांपैकी कोणीही दारूच्या नशेत नसल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या मित्राला मात्र कोणतीही दुखापतही झालेली नाही. ग्लेन मॅक्सवेलची प्रकृती सध्या चांगली असून, त्याला बरे वाटत आहे. अशी माहिती ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणाले.

"सफेद चेंडूच्या क्रिकेटमधील ग्लेन संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे आणि आम्ही त्याच्या लवकर पूर्णपणे बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. मॅक्सवेलच्या जागी सीन अॅबॉटचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. मॅक्सवेल बिग बॅश लीगमध्येही खेळू शकणार नाही. याशिवाय, तो डिसेंबरच्या सुरुवातीला शेफिल्ड शिल्डमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघाकडून देखील खेळणार नाही." अशी माहिती जॉर्ज बेली यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT