Patanjali Food: बाबा रामदेवांची 'पतंजली' तोट्यात; उत्पन्न वाढले पण, नफा झाला कमी

पतंजली फूड्सचे नाव आधी रुची सोया असे होते.
Ramdev Baba
Ramdev Baba Dainik Gomantak

बाबा रामदेव यांच्या FMCG कंपनी पतंजली फूड्सच्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 31.6 टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. कंपनीची वार्षिक घट 112.28 कोटी रुपये झाली आहे. खाद्यतेलाशी संबंधित व्यवसायावर मार्जिनच्या दबावामुळे कंपनीच्या निव्वळ नफ्यात ही घसरण झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक 42 टक्क्यांनी वाढून 8,514 कोटी रुपये झाला आहे. पतंजली फूड्सचे नाव आधी रुची सोया असे होते.

Ramdev Baba
Traffic Jam in Panaji : Ironman 70.3 साठी वाहतुकीत बदल; शहरात 'ट्रॅफिक जॅम'

"मॅक्रो घटकांचा खाद्यतेलाच्या मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम होत आहे. या तिमाहीत खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. रुपयाची डॉलरच्या तुलनेत होणारी घसरण आणि चलनवाढीच्या दबावाचा परिणाम ऑपरेटिंग कॉस्टवरही झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. पण, कंपनीच्या मते, हे पूर्णपणे चक्रीय आणि त्रैमासिक इंडस्ट्री इव्हेंट्सवर आधारित आहे." असे कंपनीने बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

पतंजली फूड्सच्या शेअरची किंमत

पतंजली फूड्सचा शेअर शुक्रवारी 1.62 टक्क्यांनी घसरून 1,272 रुपयांवर बंद झाला. मागील पाच सत्रांत कंपनीची भागिदारी 5.64 टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर 7.58 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर, गेल्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना 22.39 टक्के कंपनीने परतावा दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com