Glenn Maxwell  Dainik Gomantak
क्रीडा

NZ vs AUS: लय भारी! ग्लेन मॅक्सवेलचा टी-20 इंटरनॅशनलमध्ये जलवा; 'या' बाबतीत बनला नंबर 1 ऑस्ट्रेलियन खेळाडू

Glenn Maxwell: या सामन्यात मॅक्सवेलला फलंदाजीत विशेष काही करता आले नाही. चार चेंडूत एका षटकारासह केवळ 6 धावा करुन तो पॅव्हेलियनमध्ये परतला.

Manish Jadhav

New Zealand vs Australia: न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना 72 धावांनी जिंकून ऑस्ट्रेलियाने आता मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनेही एक मोठी उपलब्धी आपल्या नावावर केली आहे, ज्यामध्ये तो आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू बनला आहे. मात्र, या सामन्यात मॅक्सवेलला फलंदाजीत विशेष काही करता आले नाही. चार चेंडूत एका षटकारासह केवळ 6 धावा करुन तो पॅव्हेलियनमध्ये परतला.

मॅक्सवेलने ॲरॉन फिंचचा विक्रम मोडला

दरम्यान, ग्लेन मॅक्सवेलच्या आधी ऑस्ट्रेलियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम माजी कर्णधार ॲरॉन फिंचच्या नावावर होता, ज्याने 103 सामने खेळताना 125 षटकार ठोकले होते. तर मॅक्सवेलने आता त्याला मागे टाकले असून त्याने 105 सामन्यांमध्ये 126 षटकार ठोकले आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने आतापर्यंत 113 षटकार ठोकले आहेत.

याशिवाय, टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, ज्यामध्ये तो आता या यादीत फक्त मार्टिन गुप्टिल आणि रोहित शर्माच्या मागे आहे.

कमिन्सच्या अष्टपैलू खेळीमुळे ऑस्ट्रेलिया जिंकला

ऑकलंडच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या दुसऱ्या टी-20 सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजीला आला, ज्यामध्ये त्यांनी 115 धावांपर्यंत 5 विकेट गमावल्या, त्यानंतर पॅट कमिन्सच्या 28 धावांच्या खेळीच्या जोरावर संघाने विजय मिळवला. येथून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत न्यूझीलंडचा डाव 17 षटकांत 102 धावांवर रोखला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत ॲडम झाम्पाने 4 तर नॅथन एलिसने 2 बळी घेतले. याशिवाय, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनीही 1-1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elon Musk: ‘ॲपल’वरती मस्क चिडले! ‘ॲप’ची शिफारस न केल्याप्रकरणी दाखल करणार दावा; Xवर व्यक्त केली नाराजी

Goa Live News: डिचोलीमधील माणसाची ४.६८ लाख रुपयांची फसवणूक

Gambling Fines: 75 लाखांचा दंड होणार! जुगाराबाबत कडक नियम; अटींचे उल्लंघन केल्यास बसणार मोठा फटका

Socorro: ‘नीज गोंयकारा’चे घर पाडले, सरकारने नुकसान भरपाई द्यावी; कुळ मुंडकार संघर्ष समितीची मागणी

Goa Pregnancy Termination: 5 वर्षांत राज्यात 9627 जणींचे गर्भपात, रोज सरासरी पाच केसेस; केंद्रीय मंत्री पटेल यांची माहिती

SCROLL FOR NEXT