AUS vs NZ: ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना लय धुतलं; आंतरराष्ट्रीय T20 मध्ये लाजिरवाणा विश्वविक्रम केला नावावर!

AUS vs NZ: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक लाजिरवाणा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.
AUS vs NZ
AUS vs NZDainik Gomantak

AUS vs NZ: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक लाजिरवाणा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे, जो इतर कोणत्याही संघाला कधीही मोडण्याची इच्छा नसेल. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पहिल्यांदाच एका संघाने सलग चार सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत.

अलीकडेच, वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने (Australia) तिन्ही सामन्यांमध्ये 200 हून अधिक धावा दिल्या होत्या, तर आजपासून सुरु झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी 215 धावा दिल्या. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आठ गडी बाद 202 धावा, दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 9 गडी बाद 207 धावा आणि तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 6 गडी बाद 220 धावा केल्या.

AUS vs NZ
AUS vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवूनही ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, उपांत्य फेरीचा मार्ग अजून कठीण

मात्र, ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. आयसीसी टी-20 विश्वचषक यंदा अमेरिका (America) आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना या फॉरमॅटमध्ये ज्याप्रकारे झोडपले जात आहे, ते सध्याच्या जगज्जेत्यासाठी चांगले लक्षण नाही. वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे ॲडम झम्पा, ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला.

AUS vs NZ
AUS vs NZ: बापरे! ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला, मात्र स्टार्क तब्बल 23 सामन्यानंतर...

दरम्यान, मिचेल स्टार्कने चार षटकांत 39 धावा, जोश हेझलवूडने चार षटकांत 36 धावा, मॅक्सवेलने दोन षटकांत 32 धावा, पॅट कमिन्सने चार षटकांत 43 धावा, मिचेल मार्शने तीन षटकांत 21 धावा, ॲडम झाम्पाने 21 धावा दिल्या. विशेष म्हणजे, तीन षटकात 42 धावा काढण्यात आल्या. तर विकेट्स फक्त स्टार्क, कमिन्स आणि मार्श यांना घेता आल्या. तिघांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने 63 धावांचे, तर रचिन रवींद्रने 68 धावांचे योगदान दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com