धेंपो स्पोर्टस क्लब संघ Dainik Gomantak
क्रीडा

Goa: धेंपो क्लबचा विजयाने क्रीडा मोसमाच्या आरंभ

धेंपो क्लबचा विजयाने मोसमास आरंभ. GFA मदतनिधी सामन्यात स्पोर्टिंग क्लबवर टायब्रकेरद्वारे मात.

दैनिक गोमन्तक

पणजी: माजी प्रो-लीग विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने गोवा फुटबॉल (Football) असोसिएशनच्या (GFA) नव्या मोसमाची सुरवात शुक्रवारी विजयाने केली. मदतनिधी सामन्यात त्यांनी निर्धारित वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला टायब्रेकरद्वारे 4-2 फरकाने हरविले.

2021-2022 मोसमाची सुरवात करणारी लढत म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर (Dhuler Stadium)झाली. धेंपो क्लबने करारबद्ध केलेला नवा गोलरक्षक डायलन डिसिल्वा ‘गोल्डन ईगल्स’च्या विजयाचा शिल्पकार ठरला. पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन स्पॉट किक्स अडवून डायलनने धेंपो क्लबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूरज हडकोणकर, ॲरिस्टन कॉस्ता, एडविन व्हिएगस व पेद्रू गोन्साल्विस यांनी पेनल्टी फटके अचूक मारले. स्पोर्टिंगच्या मार्कुस मस्कारेन्हास व लिस्टन कार्दोझ यांनीच गोलरक्षक डायलनचा अंदाज चुकविला.

म्हापशाचे नगरसेवक (Corporator)तारक आरोलकर, जीएफए उपाध्यक्ष अँथनी पांगो, कार्यकारी समिती सदस्य बाबली मांद्रेकर, जॉन सिल्वा, अँथनी फर्नांडिस, कॉस्मे ऑलिव्हेरा, फ्रँकी फर्नांडिस, ग्रेगरी फर्नांडिस, जॉन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

संधी गमावल्या:

सामन्याच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी गोल करण्याच्या संधी गमावल्या. सामन्याच्या सुरवातीस स्पोर्टिंगचा नवा खेळाडू दत्तराज गावकर याला अचूक नेम साधता आला नाही. सामन्यातील पहिले पंधरा मिनिटे स्पोर्टिंगने वरचष्मा राखला. नंतर धेंपो क्लबला सूर गवसला. त्यांच्या कीर्तीकेश गडेकरच्या लांबवरील फ्रीकिक फटक्यावर एडविन व्हिएगसने हेडिंग केले, पण चेंडू गोलपट्टीवरून गेला. 19व्या मिनिटास धेंपो क्लबला आणखी एक संधी होती. यावेळी कीर्तीकेशच्या पासवर युवा खेळाडू व्हिएरी कुलासो (Vieira Culaso)याने चेंडूवर ताबा राखत स्पोर्टिंगच्या दोघा बचावपटूंना चकवा दिला, मात्र त्याला फटका स्पोर्टिंगच्या क्लाईव्ह मिरांडा याला आपटल्यामुळे धेंपो क्लब आघाडीपासून दूर राहिला.

दक्ष गोलरक्षण:

धेंपो क्लबचा(club) गोलरक्षक डायलन नव्वद मिनिटांच्या खेळात दक्ष राहिला, त्यामुळे स्पोर्टिंगला यश मिळाले नाही. डायलनने पूर्वार्धात सेट पिसेसवर ॲल्टनचा हेडर विफल ठरविला. नंतर 58 व्या मिनिटास डायलनने अफलातून चपळाई प्रदर्शित करताना लॉईड कार्दोझ याचा धोकादायक प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. 74 व्या मिनिटास स्पोर्टिंगचा गोलरक्षक ओझेन सिल्वा याची दक्षता उल्लेखनीय ठरली. त्याने रिचर्ड कार्दोझचा ताकदवान फटका वेळीच रोखून संघाला (Team)पिछाडीपासून रोखले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT