Goa: 'महिला फुटबॉल लीग' 6 ऑक्टोबरपासून...

पाच संघांत चुरस, शंभरहून जास्त खेळाडूंचा सहभाग. राज्यातील महिला फुटबॉलपटूंना योग्य संधी देण्यासाठी व्यासपीठ मिळत असल्याने जीएफए अध्यक्ष यांनीही समाधान व्यक्त केले.
फुटबॉल लीग
फुटबॉल लीगDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (GFA) वेदांता महिला लीग फुटबॉल स्पर्धेस येत्या सहा ऑक्टोबरपासून सुरवात होत असून विजेतेपदासाठी पाच संघांत चुरस असेल. स्पर्धेत राज्यातील शंभरपेक्षा जास्त महिला फुटबॉलपटू सहभागी होतील.

महिला लीग फुटबॉल स्पर्धेचे यंदा पाचवे वर्ष आहे. गतविजेते शिरवडे स्पोर्टस क्लब, कॉम्पॅशन फुटबॉल क्लब, युनायटेड क्लब तळावली, एफसी वायएफए व एफसी गोवा हे सहभागी संघ आहेत. 6 ऑक्टोबर रोजी दोन सामने होतील. पहिला सामना FC गोवा व युनायटेड क्लब तळवली यांच्या नावेली येथेली मैदानावर खेळला जाईल. त्याचदिवशी धर्मापूर येथील मैदानावर शिरवडे क्लब व कॉम्पॅशन क्लब यांच्यात लढत होईल.

फुटबॉल लीग
महिला फुटबॉल संघात मिशेल एकमेव गोमंतकीय

ही स्पर्धा चांगलीच यशस्वी ठरली आहे. करिष्मा शिरवईकर, मिशेल कास्ताना आदी भारतीय (Indian) संघातून खेळलेल्या गोमंतकीय महिला फुटबॉलपटूंना याच स्पर्धेतून व्यासपीठ मिळाले आहे, असे आयोजकांनी म्हटले आहे. वेदांता स्पोर्टसचे अध्यक्ष अनन्य अग्रवाल यांनी सहभागी संघांना शुभेच्छा देताना सांगितले, की ‘‘महिला लीग हा अनोखा उपक्रम आहे, ज्याद्वारे प्रतिभावान महिला फुटबॉलपटूंना कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी आणि स्पर्धात्मक फुटबॉलचे व्यासपीठ मिळत आहे.’’ राज्यातील महिला फुटबॉलपटूंना योग्य संधी देण्यासाठी व्यासपीठ मिळत असल्याने GFA अध्यक्ष आमदार (MLA)चर्चिल आलेमाव यांनीही समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com