GCA Premier League Dainik Gomantak
क्रीडा

प्रीमियर लीगमध्ये संयमी समरमुळे ‘जीनो’ची बाजी

GCA Premier League : अनिर्णित लढतीत कोशंटवर धेंपो क्लबला टाकले मागे

दैनिक गोमन्तक

पणजी : यष्टिरक्षक-फलंदाज समर दुभाषी याच्या संयमी, समजूतदार फलंदाजीमुळे जीनो स्पोर्टस क्लबने शुक्रवारी जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत बाजी मारली. विजेतेपद पटकाविताना त्यांनी धेंपो क्रिकेट क्लबला कोशंटवर मागे टाकले.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झालेला दोन दिवसीय अंतिम सामना अनिर्णित राहिला. रात्री पडलेल्या पावसामुळे शुक्रवारीही खेळ सुरू होण्यास  विलंब झाला. धेंपो क्लबने पहिला डाव 6 बाद 241 धावांवर घोषित केला. विजेतेपदासाठी त्यांना जीनो क्लबचा डाव गुंडाळणे आवश्यक होता. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जीनो क्लबने पहिल्या डावात 6 बाद 187 धावा केल्या. विजेता संघ ठरविण्यासाठी कोशंटचा आधार घ्यावा लागला व त्यात जीनो क्लब सरस ठरला.

समरच्या नाबाद 73 धावा

राम दयाल व हर्षद गडेकर या मध्यमगती गोलंदाजांनी जीनो क्लबला कोंडीत पकडले, पण समर दुभाषीने जबरदस्त एकाग्रतेने फलंदाजी केली. त्यामुळे धेंपो क्लबला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संघ 3 बाद 20 असा संकटात असताना समरने कर्णधार अमोघ देसाईसह (27) चौथ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. नंतर निम्मा संघ 83 धावांत गारद झाल्यानंतर समरने गौरीश कांबळी (33) याच्यासह सहाव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी करून प्रतिस्पर्ध्यांना यश मिळू दिले नाही. अंधूक प्रकाशामुळे धेंपो क्लबलाही फिरकी माऱ्यावरच भर द्यावा लागला. गौरीशला फिरकी गोलंदाज विकास सिंगने बाद केल्यानंतर मोहित रेडकरने (नाबाद 21) समयोचित फलंदाजी करत संघाचे आणखी नुकसान टाळले. 73 धावांवर नाबाद राहिलेल्या समरने 170 चेंडूंचा सामना केला व दहा चौकार मारले.

दीपराज, अमोघ, ऋत्विक सर्वोत्तम

करिमाबाद क्लबचा दीपराज गावकर (310 धावा) स्पर्धेचा मानकरी ठरला. जीनो क्लबच्या अमोघ देसाईची (305 धावा) उत्कृष्ट फलंदाज, तर याच संघाच्या ऋत्विक नाईक (16 विकेट) याची उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कारासाठी निवड झाली. बक्षीस वितरण गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव विपुल फडके, सदस्य मोहन चोडणकर, आयसीए सदस्य सुरेश महादेवन, जीसीए प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर, माजी रणजी कर्णधार प्रशांत काकोडे, बाळकृष्ण मिस्कीन, जीनोचे पदाधिकारी सुनील आजगावकर यांच्या उपस्थितीत झाला.

संक्षिप्त धावफलक

धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव : 60 षटकांत 6 बाद 241 घोषित अनिर्णित वि. जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव : 65 षटकांत 6 बाद 187 (अमोघ देसाई 27, समर दुभाषी नाबाद 73, रवी जांगिड 11, गौरीश कांबळी 33, मोहित रेडकर नाबाद 21, राम दयाल 3-40, हर्षद गडेकर 2-24, विकास सिंग 1-40).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: चांदीची चमक अन् मंगळाची साथ! 'या' राशीसाठी 2026 ठरणार गेम चेंजर; प्रबळ नशिबासाठी करा 'हे' प्रभावी उपाय

Raghav Chadha Resigns: आम आदमी पार्टीत मोठा भूकंप! राघव चड्ढांनी पक्षाला ठोकला रामराम; केजरीवालांवर केले भ्रष्टाचाराचे आरोप

"मुंबई क्राईम ब्रांचचं नाव वापरुन 61 लाखांची लूट!" मनी लाँड्रिंगचा धाक दाखवून करायचा 'डिजिटल अरेस्ट'; अखेर गोवा पोलिसांकडून महाराष्ट्रातील भामट्याला अटक

IPL 2026: गँगवॉरच्या छायेत वाढला, क्रिकेटनं सावरलं, गुन्हेगारीचा अंधार मागं सोडून 'अकिल' बनला आयपीएल सुपरस्टार; मुंबई इंडियन्सविरुद्ध गाजवलं वानखेडेचं मैदान VIDEO

Indian Super League: गुवाहाटी येथे बरोबरीची कोंडी फुटणार? सलग दोन विजयांनंतर एफसी गोवासमोर यजमान नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान

SCROLL FOR NEXT