gautam gambhir & ms dhoni  Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: ''माझी इच्छा आहे की, एक दिवस त्यानं माझ्या जागेवर यावं अन्...'', कॅप्टन कूलच्या 'त्या' पोस्टवर काय म्हणाला गंभीर?

Gautam Gambhir Reaction On MS Dhoni Post: 'रेव्हस्पोर्ट्स ट्रेलब्लेझर्स' या कार्यक्रमात बोलताना गंभीरने धोनीच्या त्या व्हायरल पोस्टवर मनमोकळेपणाने भाष्य केले.

Manish Jadhav

Gautam Gambhir Reaction On MS Dhoni Post: भारताने अहमदाबादच्या मैदानावर टी-20 विश्वचषक उंचावल्यानंतर अवघ्या क्रिकेट विश्वात आनंदाचे वातावरण होते. मात्र, या ऐतिहासिक विजयापेक्षाही जास्त चर्चा रंगली ती म्हणजे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यातील सोशल मीडियावरील संवादाची. गंभीर आणि धोनी यांच्यातील नाते नेहमीच चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय राहिले आहे. अशातच, विश्वचषक विजयानंतर धोनीने तब्बल दोन वर्षांनंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट करत गंभीरला उद्देशून जे विधान केले, त्यावर आता खुद्द गौतम गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली असून धोनीला एक खास 'चॅलेंज'वजा इच्छाही बोलून दाखवली.

'रेव्हस्पोर्ट्स ट्रेलब्लेझर्स' या कार्यक्रमात बोलताना गंभीरने धोनीच्या त्या व्हायरल पोस्टवर मनमोकळेपणाने भाष्य केले. गंभीर म्हणाला की, धोनीने विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानावर येणे आणि संघाला पाठिंबा देणे ही खूप मोठी गोष्ट होती. गंभीरच्या गंभीर स्वभावावरुन धोनीने त्याला चिमटा काढत "कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावर हसू छान दिसतं," असं म्हटलं होतं. यावर उत्तर देताना गंभीर म्हणाला, "धोनीने मला हसायला सांगितले हे उत्तमच झाले. पण माझी अशी इच्छा आहे की, एके दिवशी धोनी माझ्या जागी (प्रशिक्षक म्हणून) डगआऊटमध्ये असेल आणि मी त्याला सोशल मीडियावर 'आता तुम्ही हसा' असे लिहू शकेन. मला आशा आहे की, त्या दिवशी तो ही डगआऊटमधून असाच हसताना दिसेल." गंभीरच्या या विधानाने चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले.

धोनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये भारतीय संघाचे, सपोर्ट स्टाफचे आणि चाहत्यांचे अभिनंदन केले होते. विशेष म्हणजे धोनीने गंभीरच्या 'इंटेन्सिटी'चे कौतुक करताना म्हटले होते की, "इंटेन्सिटी आणि हसू हे एक 'किलर कॉम्बिनेशन' आहे." तसेच, त्याने जसप्रीत बुमराहचा उल्लेख 'चॅम्पियन बॉलर' असा करत त्याचेही विशेष कौतुक केले होते.

या संवादाने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे, कारण गंभीरने आपल्या कारकिर्दीचा मोठा काळ धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. 2011 च्या विश्वचषकातील या दोघांची भागीदारी आजही प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या स्मरणात आहे. सध्या गौतम गंभीर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत असून दुसरीकडे 44 वर्षांचा महेंद्रसिंग धोनी आगामी आयपीएल हंगामासाठी सज्ज होत आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना धोनी पुन्हा एकदा मैदानात आपली जादू दाखवण्यासाठी सराव करत आहे. गंभीर आणि धोनी यांच्यातील हा हलका-फुलका संवाद भारतीय क्रिकेटमधील एका नव्या आणि सकारात्मक अध्यायाची सुरुवात मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT