Gautam gambhir on rohit sharma virat kohli test retirement Dainik Gomantak
क्रीडा

Gautam Gambhir: '..मला चुकायचे अधिकार आहेत'! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीवरती गंभीरने सोडले मौन; क्रिकेटविश्वात खळबळ

Rohit Sharma Virat Kohli Test Retirement: गंभीर यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. रोहित आणि विराट यांनी कसोटीमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यावर अनेकांनी त्यास गंभीर यांना जबाबदार धरले.

गोमन्तक डिजिटल टीम

Gambhir Reaction Kohli Rohit Retirement : मीही माणूस आहे आणि चुका होण्याचे अधिकार मलाही आहेत. खेळाडूंनीही चुका केल्या, तर दोष देऊ नये, असे व्यापक मत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी व्यक्त केले. या उत्तराला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी निवृत्तीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा संदर्भ होता.

एका मुलाखतीमध्ये गंभीर यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यावर सोशल मीडियावर अनेकांनी त्यास गंभीर यांना जबाबदार धरले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयश येत असताना गंभीर आणि रोहित-विराट यांच्यातील संबंध बिघडले असल्याची जोरदार चर्चा होती.

त्यानंतर या दोघांनी कसोटी क्रिकेटला रामराम केला. याबाबत गंभीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मतप्रदर्शनही केले होते. याबाबत विचारले असता गंभीर यांनी हे मत व्यक्त केले. खेळाडूंकडून चुका होऊ शकतात, प्रशिक्षकपदाच्या १८ महिन्यांच्या काळात माझ्याकडूनही चुका झाल्या असतील, हे मी नाकारत नाही.

योग्य हेतूने घेतलेले चुकीचे निर्णय स्वीकारार्ह असतात, परंतु चुकीचा हेतू आणि चुकीचे निर्णय हे कदापि मान्य नसते, असे गंभीर यांनी ठामपणे सांगितले. गंभीर यांनी हे उत्तर देताना रोहित आणि विराट यांच्या नावाचा उल्लेख मात्र केला नाही किंवा या दोघांच्या निर्णयाशी आपला संबंध असल्याचे सांगितले नाही. त्यांनी एकूणच आपली भूमिका मांडली.

आपल्यासाठी प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मी जोपर्यंत या पदावर आहे, तोपर्यंत ड्रेसिंग रूममध्ये प्रत्येकाकडून याचीच अपेक्षा आहे. तरच मी माझ्या पदाला न्याय दिला असे म्हणू शकेन, असे गंभीर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT