Virat Kohli Vs Gautam Gambhir
Virat Kohli Vs Gautam Gambhir Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोहली-गंभीरच्या वादावर केली मोठी कारवाई!

Manish Jadhav

IPL 2023 News: आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीरच्या वादाने खळबळ उडवून दिली, त्यानंतर लगेचच बीसीसीआयही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. विराट आणि गौतम गंभीर यांना त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला.

खरे तर, सोमवारी झालेल्या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर एकमेकांशी भिडले.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने लखनऊ सुपर जायंट्सचा 18 धावांनी पराभव केला, त्यानंतर सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वादंग पाहायला मिळाला.

कोहली आणि गंभीरमधील वाद शिगेला पोहोचला

लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात काही गोष्टीवरुन वाद झाला. वाद इतका वाढला की, सहकाऱ्यांना मध्ये पडावे लागले.

सामना संपल्यानंतर जेव्हा दोन्ही संघ पॅव्हेलियनच्या दिशेने परतत होते. तेव्हाच विराट आणि काइल मेयर्स काहीतरी बोलताना दिसले.

दोन खेळाडूंमध्ये झालेल्या वादानंतर गौतम गंभीर आणि विराटमध्ये पुन्हा एकदा तू, तू मैं, मैं बघायला मिळाली. शेवटी लखनऊ संघाचा गोलंदाज अमित मिश्रा आणि बंगळुरु संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

बीसीसीआयने तातडीने मोठी कारवाई केली

बीसीसीआयने (BCCI) लखनऊ सुपर जायंट्स आणि अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटर नवीन-उल-हक यालाही सोडले नाही. नवीन-उल-हकही या सामन्यादरम्यान विराट कोहलीसोबत भांडताना दिसला. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना बीसीसीआयने 100 टक्के मॅच फीचा दंड ठोठावला आहे.

त्याचवेळी, लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यानंतर नवीन-उल-हकला आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

लखनऊ सुपर जायंट्सच्या डावातील 17व्या षटकात नवीन-उल-हक मैदानावर विराट कोहलीसोबत वाद घालताना दिसला. सामन्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली. प्रकरण इतके वाढले होते की, अनेक खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT