Franz Beckenbauer X/FIFAWorldCup
क्रीडा

फुटबॉलविश्व हळहळले! जर्मनीचे वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू आणि कोच Franz Beckenbauer यांचे निधन

Franz Beckenbauer passed away: जर्मनीचे विश्वचषक विजेते खेळाडू आणि प्रशिक्षक फ्रांझ बेकनबॉअर यांचे निधन झाल्याने फुटबॉलविश्वात शोककळा पसरली आहे.

Pranali Kodre

Franz Beckenbauer passed away:

फुटबॉल विश्वास सध्या शोककळा पसरली आहे. दोन दिवसांपूर्वीच ब्राझीलचे विश्वविजेते खेळाडू मारिओ झगालो यांचे निधन झाले. त्यानंतर आता मंगळवारी (9 जानेवारी) अशी माहिती मिळाली आहे की जर्मनीने विश्वविजेते खेळाडू आणि प्रशिक्षक फ्रांझ बेकनबॉअर यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते.

बेकनबॉअर यांना द एंपरर या टोपननावेनेही ओळखले जात होते. त्यांनी वेस्ट जर्मनीकडून 1974 साली खेळाडू म्हणून वर्ल्डकप जिंकला. तसेच त्याने 1990 साली जर्मनीचे मॅनेजर म्हणून देखील वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले.

त्यामुळे ते झगालो यांच्यानंतर खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून वर्ल्डकप जिंकणारे दुसरेच व्यक्ती होते. नंतर असा विक्रम फ्रान्सच्या डिडियर डेसचॅम्प्स यांनीही केला. त्यांनी वेस्ट जर्मनीकडून 1972 साली युरोपियन चॅम्पियनशीप देखील जिंकली.

बेकनबॉअर यांनी वेस्ट जर्मनीसाठी 104 सामने खेळले, तसेच त्यांनी बायर्न म्युनिखसाठी 400 पेक्षा जास्त सामने खेळले. ते युरोपियन कप (सध्याची UEFA चॅम्पियन्स लीग) सलग तीन वेळा जिंकणाऱ्या बायर्न संघाचाही भाग होते. बायर्नने 1973-74, 1974-75 आणि 1975-76 या तीन वर्षी युरोपियन कप जिंकला होता.

त्यांनी जर्मन लीग आणि जर्मन कप या स्पर्धांचेही प्रत्येकी 5 वेळा विजेतेपद जिंकले. त्याचबरोबर इंटकॉन्टीनेंटल कप आणि युरोपियन कप विनर्स कप देखील जिंकला. त्यांनी प्रशिक्षक म्हणून बायर्न क्लबला बुंडेस्लिगा आणि UEFA कप जिंकून दिला.

बेकनबॉअर यांनी वयाच्या 20 व्या वर्षी जर्मनीकडून स्विडनविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तो 1966 वर्ल्डकपसाठी झालेल्या पात्रता फेरीतील सामना होता. त्यावेळी वेस्ट जर्मनीला 1966 च्या वर्ल्डकरमध्ये इंग्लंडकडून अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांनी वेस्ट जर्मनी संघात नंतर जागा पक्की केली, तसेच या संघाचे नेतृत्वही केले.

बेकनबॉअर यांनी 1964 ते 1977 दरम्यान बायर्न क्लबचे प्रतिनिधत्वही केले. पण 1977 नंतर ते न्यूयॉर्क कॉसमॉस क्लबकडून खेळले. या क्लबचे नेतृत्व त्यावेळी दिग्गज पेले करत होते. त्यानंर ते दोन वर्षे हॅमबर्गर एसव्हीकडूनही खेळले. त्यांनी खेळाडू म्हणून अखेरचा हंगाम कॉसमॉसकडून खेळला. तसेच त्यांनी 1983 साली निवृत्ती घेतली.

निवृत्तीनंतर ते प्रशिक्षण क्षेत्रात आले. त्यांनी वेस्ट जर्मनीला प्रशिक्षक म्हणून 1986 आणि 1990 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यापर्यंतही पोहचवले. 1986 साली वेस्ट जर्सनीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर 1990 साली विजेतेपद मिळवले होते.

बेकनबॉअर यांनी 1994 मध्ये बायर्नचे अध्यक्षपदही सांभाळले. तसेच 1998 साली ते जर्मन फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्षही झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 24 November 2024: केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस,कामाच्या ठिकाणी स्थिती उत्तम असेल; जाणून घ्या आजचे भविष्य

Goa Trip: तर आता कन्फर्म कराच!! डिसेंबर जवळ आलाय; गोव्याला फिरायला जायचं आहे ना?

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

SCROLL FOR NEXT