Football Ground : मयेतील फुटबॉल मैदानाचे भाग्‍य लवकरच उजळणार! खेळाडूंमध्‍ये उत्‍साह

Football Ground : ५० लाख खर्चून करणार सुधारणा : क्रीडामंत्री गावडे
Football Ground
Football GroundDainik Gomantak
Published on
Updated on

Football Ground : डिचोली, स्थानिक खेळाडूंसाठी वरदान ठरलेल्या केळबायवाडा-मये येथील फुटबॉल मैदानाला आता ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्‍हे दिसू लागली आहेत.

क्रीडा आणि युवा व्यवहार खाते तसेच क्रीडा प्राधिकरणातर्फे सुमारे ५० लाख रुपये खर्चून या मैदानाची सुधारणा करण्यात येणार आहे. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी ही माहिती दिली आहे.

मध्यंतरीच्या काळात या मैदानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्‍याची काही प्रमाणात दुर्दशा झाली आहे. या मैदानावर फुटबॉल खेळाच्या सरावासह स्पर्धाही आयोजित करण्यात येतात. आता या मैदानाचा विकास होणार असल्याने स्थानिक खेळाडूंमध्ये उत्साह पसरला आहे.

क्रीडा आणि युवा व्यवहार खाते तसेच क्रीडा प्राधिकरणातर्फे बांधण्यात आलेल्या या मैदानाचे साडेआठ वर्षांपूर्वी म्हणजेच जून २०१५ साली लोकार्पण करण्यात आले. मात्र देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने या मैदानावर अनेक गैरसोयी निर्माण झाल्या आहेत.

मैदानाभोवतालची संरक्षक भिंत कमकुवत झाली असून एका बाजूने तर भिंत कोसळली आहे. तेथे सुरक्षा म्हणून सध्या तात्पुरते लाकडी कुंपण घालण्यात आले आहे.

या मैदानाच्या सुधारणेसंदर्भात स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सरकारला दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मैदानाचे भाग्य उजळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Football Ground
Unseasonal Rain In Goa: राजधानीत 'अवकाळी' बरसला; आंबा, काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता

स्थानिक खेळाडूंची गजर ओळखून मयेतील फुटबॉल मैदानावरील साधनसुविधांमध्‍ये सुधारणा करण्यात येणार आहे.

या मैदानाची संरक्षक भिंत नव्याने बांधून मैदानाला नवी झळाळी देण्यात येईल. या कामावर सुमारे ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. लवकरच या कामाला सुरूवात करण्‍यात येईल.

- गोविंद गावडे, क्रीडामंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com