ब्राझीलचे विश्वविजेते खेळाडू अन् कोच Mario Zagallo यांचे निधन; पेलेसारख्या दिग्गजांनाही केलेलं कोचिंग

Mario Zagallo passed away: ब्राझीलचे वर्ल्डकप चॅम्पियन फुटबॉलपटू मारिओ झगालो यांचे निधन झाल्याने फुटबॉलविश्वात शोककळा पसरली आहे.
Mario Zagallo - Pele
Mario Zagallo - PeleX/BrasilEdition
Published on
Updated on

Brazil's World Cup winner Football Player and Coach Mario Zagallo passed away:

ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू मारिओ झगालो यांचे वृद्धपकाळाने निधन झाल्याची माहिती शनिवारी (6 जानेवारी) मिळाली आहे. ते ब्राझीलचे वर्ल्डकप विजेते खेळाडू आणि प्रशिक्षक राहिले आहेत. ते 92 वर्षांचे होते.

झगलो यांनी खेळाडू म्हणून 2 वेळा आणि प्रशिक्षक म्हणून 2 वेळा फुटबॉल वर्ल्डकप जिंकला आहे. ते खेळाडू आणि संघाचे मॅनेजर म्हणून वर्ल्डकप जिंकणारे पहिले व्यक्ती आहेत. त्यांनी पेलेंसारख्या खेळाडूंनाही मार्गदर्शन केले आहे.

त्यांच्या निधनाबद्दल सध्या फुटबॉल विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना ब्राझील सॉकर कॉन्फेडेरेशनचे अध्यक्ष एडनाल्डो रोड्रिग्स यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये माहिती दिली की शनिवारी पहाटे झगलो यांच्या निधनाची माहिती मिळाली. तसेच त्यांनी त्यांच्या कुटुंबाप्रती आणि चाहत्यांप्रती सहानुभूती दाखवली आहे.

Mario Zagallo - Pele
Football referee punched: धक्कादायक! तुर्की फुटबॉल क्लबच्या अध्यक्षांकडून रेफ्रीला लाईव्ह सामन्यात मारहाण, तिघांना अटक

दरम्यान, झगलो खेळलेल्या आणि मार्गदर्शन केलेल्या अनेक फुटबॉल क्लब्सने देखील दु:ख व्यक्त केले आहे.

झगलो यांनी ब्राझील फुटबॉल इतिहासात मोलाचे योगदान दिले आहे. 1958 साली ब्राझीलने जेव्हा पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला, तेव्हा ते फॉरवर्डला खेळले. तसेच 1962 साली वर्ल्डकप विजेत्या ब्राझील संघाचेही ते भाग होते. त्यांनी खेळाडू म्हणून 1965 साली खेळणे थांबवले आणि पुढच्याच वर्षी तयांनी रिओ डी जनरिओ क्लबपासून प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले.

त्यांना 1970 मध्ये ब्राझील संधाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यावेळी संघात पेले, झैरझिन्हो, गेर्सन, टोस्तो असे खेळाडू होते. त्या संघाने मेक्सिकोमध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इटलीचा पराभव करत तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद जिंकले.

Mario Zagallo - Pele
Football Ground : मयेतील फुटबॉल मैदानाचे भाग्‍य लवकरच उजळणार! खेळाडूंमध्‍ये उत्‍साह

त्यांनी 1974 सालच्या वर्ल्डकपमध्येही ब्राझीलचे प्रशिक्षकपद सांभाळले, पण त्यावेळी संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर त्यांनी 1994 सालच्या आणि 2006 सालच्या वर्ल्डकपमध्ये ब्राझीलचे प्रशिक्षक कार्लोस अलबर्टो पारेएराचे असिस्टंट म्हणून काम पाहिले.

1994 साली ब्राझीलने इटलीला पुन्हा अंतिम सामन्यात पराभूत करत वर्ल्डकप जिंकला. मात्र 2006 साली ब्राझीलला फ्रान्सकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला.

झगलो यांनी 1998 साली देखील ब्राझीलचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. मात्र अंतिम सामन्यात ब्राझीलचा पराभव झाला. 2006 नंतर त्यांनी ब्राझीलचे प्रशिक्षकपद सांभाळले नाही. त्यांनी फ्लेमेन्गो, फ्लुमिनन्स, बोटाफोगो आणि वास्को द गामा या क्लबचेही प्रशिक्षकपद सांभाळले.

दरम्यान, गेली अनेक वर्षे सातत्याने ते आजारी होते. त्यांच्यावर काही शस्त्रक्रियाही झाल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com