Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: 'फ्रँचायझींनी विकत घेतलंय...', रोहितचं IPL मध्ये खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल मोठं भाष्य

व्यस्त वेळापत्रक असल्याने खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल भारतीय कर्णधार रोहित शर्माने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या गेल्या आहेत.

Pranali Kodre

Rohit Sharma on Workload Management: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा नुकताच बुधवारी (22 मार्च) संपला. आता यानंतर लगेचच दोन्ही संघातील खेळाडू 31 मार्चपासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामासाठी आपापल्या संघात दाखल होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे 28 मे रोजी आयपीएल संपल्यानंतर लगेचच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 जूनपासून इंग्लंडला कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

हे वेळापत्रक लक्षात घेता सध्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. तसेच या गोष्टींच्या दृष्टीने खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल भारतीय संघव्यवस्थापनाने आयपीएल फ्रँचायझींना काही मार्गदर्शक नियमावली दिली आहे. पण आता या नियमावलीचे किती प्रमाणात फ्रँचायझींकडून अनुसरण होईल, याबाबत भारताचा कर्णधार रोहित शर्माने शंका व्यक्त केली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहित म्हणाला, 'सर्वकाही फ्रँचायझींवर अवलंबून आहे. फ्रँचायझींनी खेळाडूंना विकत घेतले आहे. सध्या आम्ही संघांना नियमावली दिली आहे. पण शेवटी हे सर्व फ्रँचायझींवर अवलंबून आहे आणि सर्वाधिक खेळाडूंवरही अवलंबून आहे. खेळाडूंना स्वत:ची काळजी घ्यावी लागणार आहे.'

'सर्व खेळाडू प्रौढ आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या शरिराकडे लक्ष द्यावे लागेल. जर त्यांना असे वाटत असेल की खूप जास्त होत आहे, तर ते त्याबद्दल चर्चा करू शकतात आणि एक-दोन सामन्यांसाठी विश्रांती घेऊ शकतात. पण मला शंका आहे की असे होईल.'

दरम्यान, सध्या भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतींमधून सावरत आहेत. यामध्ये ऋषभ पंत, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू दीर्घकाळासाठी भारतीय संघातून बाहेर गेले आहेत.

याबद्दल रोहित म्हणाला, 'जर खेळाडू उपलब्ध नसतील, तर हे काळजी करण्यासारखे आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये असणाऱ्या खेळाडूंची कमी तुम्हाला जाणवते. खरंतर प्रत्येकजण त्यांचा सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. आम्ही खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित करत आहोत. आपल्याला ठरविक काळासाठी ठराविक खेळाडूंना विश्रांती द्यावी लागणार आहे.'

'मी कोणी तज्ञ नाही की दुखापतींबद्दल फार काही सांगू शकेल. मेडिकल टीम हे सर्व पाहात आहे. मला खात्री आहे की वर्ल्डकपमध्ये आमच्याकडे सर्वोत्तम 15 जणांचा संघ असेल.'

दरम्यान, भारतीय संघातील जवळपास सर्वच प्रमुख खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT