France Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: फ्रान्सने विश्वविजेतेपद जिंकले, तर रचले जाणार 4 मोठे वर्ल्डरेकॉर्ड

फ्रान्सने फिफा वर्ल्डकप 2022 जिंकला, तर त्यांच्या नावावर 4 मोठे विक्रम होऊ शकतात.

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 मधील सांगता रविवारी होणार आहे. रविवारी लुसैल स्टेडियमवर अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स संघ आमने-सामने असतील. दरम्यान, फ्रान्स गतविजेते आहेत. त्यांनी 2018 साली झालेला फिफा वर्ल्डकप जिंकला होता. आता त्यांनी जर यंदाचा वर्ल्डकपही जिंकला, तर त्यांच्या नावावर मोठे विक्रम होऊ शकतात.

महत्त्वाचे म्हणजे जर अर्जेंटिना या सामन्यात हरले, तर ते चौथ्यांदा वर्ल्डकप इतिहासात उपविजेते ठरतील. यापूर्वी 1930, 1990 आणि 2014 साली त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

तसेच फ्रान्सने यावर्षी वर्ल्डकप जिंकला, तर गेल्या 60 वर्षात सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकणारा फ्रान्स पहिला संघ ठरेल. यापूर्वी अखेरचा असा कारनामा ब्राझीलने केला होता. त्यांनी 1958 आणि 1962 साली सलग दोन वेळा वर्ल्डकप जिंकला होता.

त्याचबरोबर सलग दोन वेळा वर्ल्डकप जिंकणारा फ्रान्स एकूण तिसरा संघही ठरू शकतो. यापूर्वी ब्राझीलच्या आधी इटलीने 1934 आणि 1938 साली सलग दोनदा वर्ल्डकप जिंकण्याचा कारनामा केला होता.

याशिवाय फ्रान्सचे प्रशिक्षक डिडिएर डेसचॅम्प्स हे दोन सलग वर्ल्डकप जिंकणारे दुसरेच प्रशिक्षक ठरू शकतात. यापूर्वी 1934 आणि 1938 साली विटोरियो पॉजो यांनी असा कारनामा केला होता.

तसेच डेसचॅम्प्स यांनी फ्रान्ससाठी खेळाडू म्हणून 1998 साली वर्ल्डकपही जिंकला आहे. त्यामुळे जर यंदाही फ्रान्सने विजेतेपद राखले, तर ते खेळाडू म्हणून एक आणि प्रशिक्षक म्हणजे दोन वर्ल्डकप जिंकणारे पहिलेच व्यक्ती ठरतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT