Sebastian Vettel Dainik Gomantak
क्रीडा

F1 Champion Sebastian Vettel केली निवृत्तीची घोषणा !

Sebastian Vettel Retirement: जर्मनीचा फॉर्म्युला वन किंग सेबॅस्टियन वेटेल याने निवृत्तीची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

F1 Champion Sebastian Vettel Retirement: जर्मनीचा फॉर्म्युला वन किंग सेबॅस्टियन वेटेल याने निवृत्तीची घोषणा केली आहे. तो सध्या अ‍ॅस्टन मार्टिनचा ड्रायव्हर आहे. चार वेळा फॉर्म्युला वन चॅम्पियन सेबॅस्टियन 2022 हंगामाच्या शेवटी निवृत्त होईल. या मोसमात तो शेवटच्या वेळी त्याच्या एफ वनसोबत रेसिंग ट्रॅकवर दिसणार आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 53 वेळा रेसिंग ट्रॅकवर विजय मिळवला आहे. सेबॅस्टियनने 2007 मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक वेळा आपली ताकद दाखवली.

दरम्यान, सेबॅस्टियन (Sebastian Vettel) हा फॉर्म्युला वनच्या जगातील सर्वोत्तम रेसर्सपैकी एक आहे. ग्रँड प्रिक्स विजयाच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 53 सामने जिंकले आहेत. तर लुईस हॅमिल्टन (Lewis Hamilton) या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने 103 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, मायकेल शूमाकर यामध्ये 91 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, सेबॅस्टियन चार वेळा फॉर्म्युला वनचा चॅम्पियन (Champions) ठरला आहे. 2010 ते 2013 पर्यंत तो चॅम्पियन होता.

दुसरीकडे, सेवानिवृत्तीची घोषणा केल्यानंतर सेबॅस्टियन म्हणाले, "गेल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक अनुभवी स्पर्धक पाहिले. मी सर्वांचा आभारी आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून अ‍ॅस्टन मार्टिन ड्रायव्हर आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT