Commonwealth Games: PV सिंधू बनली भारतीय संघाची ध्वजवाहक, 'ही एक मोठी जबाबदारी...'

Commonwealth Games 2022: PV सिंधू कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय दलाची ध्वजवाहक असेल.
 PV Sindhu
PV SindhuDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

PV Sindhu: PV सिंधू कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय दलाची ध्वजवाहक असेल. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय दलाची ध्वजवाहक बनल्याबद्दल पीव्ही सिंधूने आनंद व्यक्त केला आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने दोनदा ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली आहेत. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हा दुसरा ध्वजवाहक असेल. मनप्रीत सिंगने भारतीय संघाचा दुसरा ध्वजवाहक झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

'भारतीय संघाचा ध्वजवाहक असल्याचा अभिमान आहे'

सिंधू म्हणाली की, ''2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय दलाचा ध्वजवाहक होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मी याबद्दल खूप आनंदी आहे आणि माझ्या सहकारी खेळाडूंना शुभेच्छा देऊ इच्छिते. याशिवाय मला भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी मला ही संधी दिली.'' विशेष म्हणजे, भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने 2016 च्या रिओ ऑलिम्पिक आणि 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) देशासाठी पदके जिंकली होती.

 PV Sindhu
Commonwealth Games 2022: भारतीय बॉक्सर्स मारणार 'गोल्ड पंच', 30 जुलैला रंगणार सामने

'पीव्ही सिंधूला आमच्या शुभेच्छा'

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव राजीव मेहता म्हणाले की, ''पीव्ही सिंधू (PV Sindhu) कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय संघाची ध्वजवाहक बनली याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही तिला शुभेच्छा देऊ इच्छितो. त्याचबरोबर इतर भारतीय खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची आपेक्षा आहे. 2022 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचे (India) 213 खेळाडू सहभागी होत आहेत. मात्र, नीरज चोप्रा दुखापतीमुळे या स्पर्धेचा भाग नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com