Rohit Sharma 
क्रीडा

World Cup 2023: रोहितचे आक्रमण अन् गोलंदाजांची कमाल, भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयाची 4 कारणे

India vs Pakistan: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयात कोणत्या 4 गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या याचा घेतलेला आढावा

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Pakistan:

भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी पाकिस्तानविरुद्ध वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत झालेल्या सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. हा भारताचा यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला.

या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 192 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 30.2 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. दरम्यान भारताच्या या विजयाची चार महत्त्वाची कारणे कोणती होती याचा घेतलेला हा आढावा.

नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

भारताचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय भारतासाठी फायदेशीर ठरला. कारण, खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती आणि दुसऱ्या डावावेळी मैदानात दव पडण्याची शक्यता होती. अशात धावांचा पाठलाग करणे सोपे होते. दरम्यान, प्रत्यक्ष सामन्यातही ही गोष्ट दिसून आली.

गोलंदाजांची सांघिक कामगिरी

खेळपट्टी फलंदाजीला पोषक असली, तरी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. सुरुवात चांगली मिळाल्यानंतरही पाकिस्तानने पहिल्या दोन विकेट्स लवकर गमावल्या होत्या. पण नंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी 82 धावांची भागीदारी केली होती.

मात्र, असे असले तरी त्यांची फलंदाजी सुरू असताना भारतीय गोलंदाजांनी अनेकदा त्यांच्याविरुद्ध अपीलही केले होते. त्यामुळे पाकिस्तानवरील दवाब कमी होणार नाही, याची काळजी भारतीय गोलंदाजांनी घेतली.

बाबर आणि रिझवान या दोघांची जोडी फुटली तेव्हा पाकिस्तान संघ 3 बाद 155 धावा अशा परिस्थितीत होता. मात्र, यानंतर अवघ्या 36 धावांत पाकिस्तानची दाणादाण भारतीय गोलंदाजांनी उडवली. त्यामुळे पाकिस्तान संघ 191 धावांवर सर्वबाद झाला.

विशेष म्हणजे भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा या पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

रोहितचे आक्रमण

भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याने पहिल्याच चेंडूवर शाहिन आफ्रिदीविरुद्ध चौकार ठोकला होता. त्याच्या आक्रमणामुळे पाकिस्तानी गोलंदाजांना भारतावर दबाव टाकण्यात अपयश आले.

भारताने पहिली विकेट लवकर गमावली, तरी रोहितने आपली लय कायम ठेवत सातत्याने पाकिस्तान गोलंदाजांवर केलेल्या आक्रमणामुळे भारतासाठी विजय मिळवणे सोपे झाले. रोहितने 63 चेंडूतच 86 धावांची अर्धशतकी खेळी केली.

भागीदाऱ्यांनी केला विजय सोपा

भारताने शुभमन गिलच्या रुपात पहिली विकेट लवकर गमावली असली तरी नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी झाल्या. गिलच्या विकेटनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात 56 धावांच्या भागीदारी झाली. त्यांच्या या भागीदारीने भारताच्या डावाला स्थैर्य दिले.

तसेच विराट 16 धावांवर बाद झाल्यानंतरही श्रेयस अय्यरने रोहितची चांगली साथ दिली. त्यांच्यातही तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी झाली. पण रोहितची विकेट गेल्याने ही भागीदारीही तुटली.

मात्र, त्यानंतरही श्रेयसने (53*) केएल राहुलला (19*) साथीला घेत भारताला विजयापर्यंत पोहोचवले. त्यांच्यातही 36 धावांची नाबाद भागीदारी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT