Real Madrid
Real Madrid Twitter
क्रीडा

Real Madrid: धक्कादायक! आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी रिअल मद्रिदच्या 4 खेळाडूंना अटक

Pranali Kodre

Four Real Madrid youth players arrested alleged sharing Offensive video of minor :

फुटबॉल विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिअल मद्रीद क्लबच्या चार युवा खेळाडूंना गुरुवारी (14 सप्टेंबर) स्पॅनिश पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली असून त्यांच्यावर अल्पवयीन मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अनेक युरोपियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार या खेळाडूंची चौकशी करण्यात आली असून त्यांच्या मोबाईल फोनमधील डेटा जप्त केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. या खेळाडूंवर 16 वर्षीय मुलीशी जूनमध्ये लैंगिक संबंध ठेवल्यानंतर त्यासंदर्भातील व्हिडिओ शेअर करण्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या सहमतीने हे संबंध झाल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यासंदर्भात व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याचे तिला माहित नव्हते. व्हिडिओ रेकॉर्डिंगबद्दल तिला नुकतेच समजले आहे.

या खेळाडूंना क्लबच्या ट्रेनिंग कॉम्प्लेक्समधून ताब्यात घेतले होते. त्यांच्याबद्दल क्लबने म्हटले आहे की सर्व गोष्टी लक्षात घेऊन योग्य उपाययोजना केल्या जातील.

चार खेळाडूंपैकी 3 खेळाडू हे रिअल मद्रिदच्या सी संघातील आहेत, तर एक खेळाडू क्लबच्या बी संघातील म्हणजेच कॅस्टिला संघातील आहे.

या चार खेळाडूंविरुद्ध 16 वर्षीय पीडित मुलीच्या आईने कॅनरी आयलंड्समध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या खेळाडूंवर व्हॉट्सऍपद्वारे व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) शिस्त समितीने स्पेन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष लुईस रुबियालेस यांना 3 महिन्यांसाठी निलंबित केले आहे. त्यांच्यावर महिला फिफा वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर स्पेनची खेळाडू जेनी हर्मोसोचे डोके पकडून तिला ओठांवर किस केले होते.

त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे, तसेच त्यांना या प्रकरणामुळे आपल्या पदाचाही राजीनामा द्यावा लागला आहे. हे प्रकरण चर्चेत असतानाच आता रिअल मद्रीदच्या खेळाडूंचेही प्रकरण समोर आल्याने चर्चा होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Budget 2024: पीएम किसानच्या हप्त्यात होणार वाढ? कृषी तज्ञांनी अर्थमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

SCROLL FOR NEXT