Afghanistan Dainik Gomantak
क्रीडा

U19 World CUP: अफगाणिस्तानच्या 'या' खेळाडूंनी मायदेशी परतण्यास दिला नकार

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) अंडर-19 विश्वचषक संघातील चार खेळाडूंनी आपल्या मायदेशात परतण्यास नकार दिला आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानच्या अंडर-19 विश्वचषक संघातील चार खेळाडूंनी आपल्या मायदेशात परतण्यास नकार दिला आहे. वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कप खेळल्यानंतर हे चार खेळाडू अफगाणिस्तानऐवजी इंग्लंडला (England) पोहोचले आहेत. मात्र हे चार खेळाडू यूकेमध्ये आश्रय मागत आहेत की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. अंडर-19 विश्वचषक (U19 World CUP) स्पर्धेत अफगाणिस्तानचा (Afghanistan) संघ चौथ्या स्थानावर राहिला.

ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, हे चार खेळाडू सध्या लंडनमध्ये असून त्यांचा व्हिसा 8 फेब्रुवारीला संपणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अनेकांनी या खेळाडूंना मायदेशात परतण्याची मागणी केली आहे. यूके सरकारच्या नियमांनुसार, ट्रान्झिट व्हिसावर असलेली व्यक्ती 48 तासांपेक्षा जास्त काळ देशात राहू शकत नाही.

लाखो लोकांचे स्थलांतर झाले

गेल्या वर्षी अफगाणिस्तानात तालिबान (Taliban) सत्तेवर आल्यानंतर माजी राष्ट्रपती, नोकरशहा, खेळाडू आणि नागरिकांसह दहा लाखांहून अधिक अफगाण नागरिकांनी देश सोडला. अफगाणिस्तानचा माजी खेळाडू रईस अहमदझाईने म्हटले आहे की, 'खेळाडू आपल्या निर्णयावर पुनर्विचार करतील आणि देशात परत येतील अशी आशा आहे.' विश्वचषकादरम्यान अहमदझाई संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.

अहमदझाई म्हणाले, "त्यांना माझे संदेश मिळाले. परंतु त्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. मी त्यांना सांगितले की, अफगाणिस्तानला त्यांची गरज आहे. अफगाणिस्तान क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी काम केले आहे."

भारताने पाचव्यांदा जेतेपद पटकावले

अंडर-19 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करत पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. भारत हा सर्वात जास्त वेळा ही स्पर्धा जिंकणारा संघ आहे. टीम इंडियाने यापूर्वी 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. भारताने आठ वेळा अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे. यामध्ये भारतीय संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे, तर तीन वेळा (2006, 2016 आणि 2020) पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

Modi Government: मोदी सरकारसाठी पुढचे तीन महिने कसोटीचे; विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’ उलटवण्याचे आव्हान

Catch Of The Year! शुभमन गिलचा भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

SCROLL FOR NEXT