Former Zimbabwe Captain And veteran All-Rounder Heath Streak Dainik Gomantak
क्रीडा

Heath Streak: 'मी जिवंतच..., हा रनआऊट मागे घ्या', मृत्यूच्या बातमीवर माजी क्रिकेटरचा खुलासा

Heath Streak Death Rumors: झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५ कसोटी आणि १८९ एकदिवसीय सामने खेळणाऱ्या स्ट्रीकने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला असल्याचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ashutosh Masgaunde

Former Zimbabwe Captain And veteran All-Rounder Heath Streak Death Rumors:

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीकचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले असल्याची बातमी बुधवारी सकाळी सर्वत्र पसरली होती. मात्र, ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. हीथ स्ट्रीक जिवंत असल्याची त्याचा मित्र आणि माजी संघसहकारी हेन्री ओलोंगा याने दिली आहे.

झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या स्ट्रीकने मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली होती.

मात्र, या वृत्तानंतर काही वेळातच ओलोंगाने एक्सवर (ट्विटर) स्ट्रीक जिवंत असल्याची पुष्टी केली. त्याने लिहिले, 'मी पुष्टी करतो की हिथ स्ट्रीकच्या निधनाचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे. मी नुकतेच त्याच्याकडूनच ऐकले आहे. तिसऱ्या पंचांनी त्याला परत बोलावले असून. लोकहो, तो पूर्ण जिवंत आहे.'

याबरोबरच ओलोंगाने स्ट्रीकशी झालेल्या संवादाचा फोटोही शेअर केला आहे. ज्यात दिसते की स्ट्रीकने त्याला मेसेज केलाय की 'मी पूर्ण जिवंत आहे. मित्रा, प्लीज हा रनआऊटचा निर्णय बदला.'

झिम्बाब्वेसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

माजी कर्णधार स्ट्रीक 90 च्या दशकाच्या शेवटी आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळात संघाच्या प्रमुख सदस्यांपैकी एक होता. तो केवळ चांगला गोलंदाजच नव्हता तर खालच्या फळीत तो उपयुक्त फलंदाजही होता.

माजी अष्टपैलू खेळाडूने आपल्या देशासाठी 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामने खेळले आहेत. झिम्बाब्वेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये 216 आणि एकदिवसीय सामन्यात 239 विकेट्स घेऊन तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.

कसोटीत सर्वाधिक वेळा 5 बळी घेण्याचा विक्रम

अनुभवी अष्टपैलू स्ट्रीक कसोटीत 100 पेक्षा जास्त बळी घेणारा झिम्बाब्वेचा पहिला आणि एकमेव गोलंदाज होता आणि एकदिवसीय सामन्यात 100 पेक्षा जास्त विकेट घेणारा झिम्बाब्वेच्या चार गोलंदाजांपैकी एक होता.

कसोटी क्रिकेटमध्ये 1,000 धावा आणि 100 बळी घेण्याची कामगिरी करणारा तो झिम्बाब्वेचा पहिला आणि एकमेव खेळाडू होता.

तसेच, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2,000 धावा आणि 200 बळी पूर्ण करणारा तो झिम्बाब्वेचा पहिला आणि एकमेव खेळाडू होता. झिम्बाब्वेकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५ बळी घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. स्ट्रीकने सात वेळा ही कामगिरी केली आहे.

ICC कडून 8 वर्षांची बंदी

ICC च्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एप्रिल 2021 मध्ये स्ट्रीकवर क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या सहभागावर आठ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. झिम्बाब्वेचा माजी कर्णधार "मिस्टर एक्स" नावाच्या मॅच फिक्सिंग करणाऱ्या व्यक्तीला मदत केल्याबद्दल दोषी आढळला होता.

2017 मध्ये त्याला सुमारे 35,000 डॉलर्सचे किमतीचे दोन बिटकॉइन आणि एक आयफोन मॅच फिक्सर्सकडून पेमेंट म्हणून मिळाल्याचा आरोप आहे.

स्ट्रीकवर इंडियन प्रीमियर लीग (IPL), पाकिस्तान सुपर लीग आणि अफगाणिस्तान प्रीमियरसह फ्रँचायझी T20 लीगबद्दल अंतर्गत माहिती उघड केल्याचा आरोप होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT