भारताचा कर्णधार विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्याने अनेक क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांनी आपले मत व्यक्त केले. आज एका व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनेही यावर प्रतिक्रिया दिली. विराट कोहलीला (Virat Kohli) भारताचे कर्णधारपद सोडण्यास भाग पाडण्यात आले, असे वक्तव्य पाकिस्तानचे (Shoaib Akhtar spoke about Virat Kohli's resignation as captain) माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) केले आहे.
गेल्या वर्षी, कोहली T20I कर्णधारपदावरून पायउतार झाला होता आणि नंतर निवडकर्त्यांना व्हाईट-बॉल फॉरमॅटसाठी एक कर्णधार हवा होता म्हणून त्याला एकदिवसीय लीडर म्हणून काढून टाकण्यात आले होते. सात वर्षे संघाचे नेतृत्व केल्यानंतर विराट कोहलीने गेल्या आठवड्यात भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून निवृत्ती घेतली.
सध्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (Cricket) भाग घेत असलेल्या अख्तरने एएनआयशी (ANI) बोलताना सांगितले की. "विराटने कर्णधारपद सोडले नाही, त्याला तसे करण्यास भाग पाडण्यात आले. त्याच्यासाठी ही वेळ चांगली नाही पण त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची गरज आहे. तो धाडसी आणि मजबूत इरादे घेवून खेळणारा खेळाडू आहे. तो एक चांगला व्यक्ती आणि उत्तम क्रिकेटपटू आहे. तो एक ग्रेट फलंदाज आहे फक्त आता त्याने त्याच्या प्रवाहा सोबत खेळण्याची गरज आहे."
ICC पुरुष T20 विश्वचषक 2022 चे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. मेन इन ब्लू 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी भारताची (India) लढत होणार आहे. पुरुषांचा T20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे आणि तो मेलबर्न, सिडनी, ब्रिस्बेन, अॅडलेड, गिलॉन्ग, होबार्ट आणि पर्थ या सात ठिकाणी खेळवला जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.