ICC अंडर-19 विश्वचषक 2022 (ICC Under 19 World cup) मध्ये ब गटातील त्यांच्या अंतिम सामन्यात, भारताने युगांडाचा 326 धावांनी पराभव करून स्पर्धेत त्यांचा सलग तिसरा विजय नोंदवला. या सामन्यात राज बावाने नाबाद 162 धावांनी शानदार खेळी केली. यासह बावाने (Raj Bawa) अंडर 19 विश्वचषक भारतीय फलनदाजाचा सर्वोच्च वैयक्तिक धाव संख्येचा रेकॉर्ड मोडला. यापूर्वी हा विक्रम शिखर धवनच्या नावावर होता, ज्याने 2004 मध्ये केनियाविरुद्ध 155 धावा केल्या होत्या.
ब्रायन लारा स्टेडियमवर प्रथम फलदाजी करताना भारतीय संघाने 5 बाद 405 धावा केल्या ज्यामध्ये राज बावाने नाबाद 162 आणि आंग्रिश रघुवंशीने 144 धावा केल्या. यांनतर भारतीय संघाने गोलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केल्याने युगांडाचा संघ 19.4 षटकांत 79 धावात गारद झाला. निशांत संधूने 19 धावात चार बळी आपल्या खात्यात जमा केले. भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान आधीच पक्के केले आहे.
टुर्नामेन्टच्या सुरुवातीला भारतीय कॅम्पला अनेक कोरोना विषाणूचा फटका बसला होता, ज्यामुळे त्यांचा नियमित कर्णधार यश धूलला मागील गेम आणि या सामन्यातून बाहेर बसावे लागले. भारतीय संघाने चार वेळा विजेतेपद पटकावल्यामुळे स्पर्धेच्या इतिहासातील भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. शेवटच्या वेळी 2020 मध्ये प्रियमी गर्गच्या नेतृत्वाखालील 19 वर्षाखालील संघ उपविजेता ठरला तर बंगलादेशने त्यांचे ICC विजेतेपद जिंकले.
युगांडावर 326 धावांनी मिळवलेला विजय हा भारतीय संघाचा अंडर-19 वनडे मधला सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 2004 मध्ये भारताने स्कॉटलंडचा 270 धावांनी पराभव केला होता. एकूणच या फॉरमॅटमधील कोणत्याही अंडर-19 संघाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाने केनियाचा 430 धावांनी पर्व केला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.