Gyanendra Malla Dainik Gomantak
क्रीडा

Cricketer Retirement: बांगलादेशनंतर नेपाळला धक्का! आशिया कपपूर्वी 32 वर्षाच्या 'या' क्रिकेटरनं घेतली निवृत्ती

Nepal Cricket: नेपाळच्या दिग्गज क्रिकेटरने 32 व्या वर्षीच अचानक निवृत्ती घेतली आहे.

Pranali Kodre

Nepal's Gyanendra Malla announces retirement from international Cricket:

आशिया चषक 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पण या स्पर्धेपूर्वीच बांगलादेशच्या तमिम इक्बालने कर्णधारपद सोडत दुखापतीमुळे स्पर्धेतूनही माघार घेतली. त्यानंतर आता लगेचच नेपाळ संघालाही धक्का बसला आहे. नेपाळचा 32 वर्षांचा माजी कर्णधार ज्ञानेंद्र मल्ला याने निवृत्ती घेतली आहे.

मल्लाने सोशल मीडियावर पोस्ट करत 9 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा म्हटले आहे. त्याने 2014 साली टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून हाँग काँग विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 2019 ते 2021 दरम्यान नेपाळचे नेतृत्वही केले. त्याने नेतृत्व केलेल्या 22 सामन्यांपैकी 15 सामन्यात नेपाळने विजय मिळवला आहे.

मल्ला त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 4 जुलै 2023 रोजी वर्ल्डकप 2023 क्वालिफायर स्पर्धेत आयर्लंडविरुद्ध हरारे येथे खेळला होता. तो नेपाळचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.

मल्लाने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की 'जड अंतःकरणाने, पण मनापासून कृतज्ञतेने, मला वाटते की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे.'

'माझ्या अस्तित्वाचे सार असलेल्या या पवित्र खेळाने स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरावर खेळण्यापर्यंत मला आयुष्य, समर्पण आणि एकतेची ताकदीबद्दल महत्त्वाचे धडे दिले. मैदानात केलेल्या प्रत्येक वाटचालीसह मला देशाचे प्रतिनिधित्व केल्याचा, देशाच्या आशा आणि स्वप्नांचे प्रतिक असलेली जर्सी घालण्याचा अभिमान वाटला.'

त्याने पुढे लिहिले, 'माझ्या संघसहकारी, जे फक्त सहकारीपेक्षा अधिक जवळचे झाले, त्यांना धन्यवाद. तुम्ही माझे कुटुंब झालात आणि आपण एकत्र एक अतूट नातं बनवलं. प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ, तुमचे मार्गदर्शन आणि माझ्यावरील विश्वास माझ्या कारकिर्दीला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. आणि माझे चाहते, तुमचा पाठिंबा माझ्या हृदयात नेहमी राहिल. माझ्या चढ-उतारात तुमच्या पाठिंब्याने मला स्थिर ठेवले.'

'हा निरोप नाही, तर माझ्या प्रवासातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे. या प्रवासात मी नेहमीच या खेळाचा समर्थक राहिल, क्रांतीचा साक्षीदार राहिल आणि ज्या देशावर माझे खूप प्रेम आहे, त्याचा अभिमानाने ध्वजवाहक राहिल.'

मल्लाची कारकिर्द

मल्लाने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 37 वनडे सामने खेळले, ज्यात त्याने 7 अर्धशतकांसह 876 धावा केल्या. तसेच त्याने 45 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले. ज्यात त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 883 धावा केल्या.

तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये नेपाळकडून शतक करणाऱ्या चार खेळाडूंपैकी एक आहे. त्याने हे शतक भुतानविरुद्ध 2019 साली केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT