Manoj Tiwary
Manoj TiwaryDainik Gomantak

Manoj Tiwary Retirement: 10 हजार धावा अन् 100 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा दिग्गज भारतीयाचा क्रिकेटला अलविदा

Manoj Tiwary: 'अलविदा क्रिकेट!' म्हणत पश्चिम बंगालमध्ये क्रीडामंत्री असलेल्या भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Published on

Manoj Tiwary Cricket Retirement: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू मनोज तिवारीने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. 3 ऑगस्ट 2023 रोजी त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या निवृत्तीचा निर्णय सर्वांसमोर घोषित केला.

पश्चिम बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या तिवारीने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत 10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तसेच 100 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तो सध्या पश्चिम बंगालमध्ये क्रीडा मंत्री म्हणून देखील काम करतो.

तिवारीने त्याच्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की 'क्रिकेटच्या खेळाला अलविदा. या खेळाने मला सर्वकाही दिले आहे, मला म्हणायचे आहे की ती प्रत्येक गोष्ट दिली ज्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, त्या काळापासून जेव्हापासून माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची कठीण आव्हाने मिळाली होती.'

'मी या खेळाप्रती आणि माझ्या पाठीशी नेहमीच असणाऱ्या देवाचा सैदव ऋणी असेल. माझ्या क्रिकेट प्रवासात योगदान देणाऱ्या त्या सर्व लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.'

Manoj Tiwary
Retirement Announced: 'या' स्टार यष्टीरक्षक फलंदाजाने 17 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला केला अलविदा, चाहत्यांना मोठा धक्का!

मनोजने त्याच्या या पोस्टमध्ये त्याचे पितृतुल्य प्रशिक्षक मनाबेंद्र घोष यांचे विशेष आभार मानले आहे. त्याने म्हटले आहे की 'पितृतुल्य प्रशिक्षक मनाबेंद्र घोष माझ्या क्रिकेट प्रवासातील महत्त्वाचा खांब आहेत. जर ते नसते, तर मी क्रिकेटमध्ये कुठेच पोहचू शकलो नसतो. सर तुमचे आभार आणि तुम्ही लवकर बरे व्हा या शुभेच्छा, कारण सध्या तुमची तब्येत वर-खाली होत आहे.'

त्याचबरोबर मनोजने त्याच्या पोस्ट या पोस्टमध्ये त्याच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या सर्व प्रशिक्षकांचे आभार मानले आहेत. तसेच त्याने त्याच्या आई-वडिलांबद्दलही त्याच्यावर कोणताही दबाव न ठेवता त्याला प्रेरणा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

तसेच त्याने त्याची पत्नी सुश्मिता रॉय हिचेही मनापासून आभार मानले आहेत. याशिवाय त्याने खेळलेल्या सर्व संघातील सर्व संघसहकाऱ्यांचेही आभाग मानले असून चाहत्यांबद्दलही प्रेम व्यक्त केले आहे.'

त्याने त्याच्या पोस्टमध्ये अखेरीस कोणाचे नाव घ्यायचे राहिले असल्यास माफी मागितली आहे. तसेच त्याने 'क्रिकेटचे आभार' असे म्हणत पोस्टची अखेर केली आहे.

Manoj Tiwary
Stuart Broad Retirement: निवृत्तीचा सामना, शेवटचा बॉल अन् सिक्स! ब्रॉडने बापाच्या डोळ्यांचे फेडले पारणे

मनोज तिवारीची कारकिर्द

मनोज तिवारीने भारताकडून 2008 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो भारताकडून अखेरीस 2015 साली खेळला होता. त्याने भारताकडून 12 वनडे आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले. त्याने वनडेत एका शतकासह 287 धावा केल्या आणि 5 विकेट्स घेतल्या, तसेच आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याने 15 धावा केल्या.

तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार काळ खेळू शकला नसला, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दीर्घकाळ क्रिकेट खेळले. त्याने पश्चिम बंगालकडून रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.

त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 141 सामने खेळले असून 9908 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 29 शतकांचा आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 32 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच त्याने 169 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 6 शतके आणि 40 अर्धशतकांसह 5581 धावा केल्या आहेत आणि 63 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 183 टी20 सामने खेळले असून 15 अर्धशतकांसह 3436 धावा केल्या आहेत आणि 34 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com