Former Indian cricketer Yuvraj Singh became father
Former Indian cricketer Yuvraj Singh became father  Dainik Gomantak
क्रीडा

Yuvraj Singh Baby Boy: युवीच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन

दैनिक गोमन्तक

भारताचा माजी क्रिकेटर (Indian Cricketer) युवराज सिंग एका मुलाचा बाप झाला आहे. 40 वर्षीय युवराजने मंगळवारी रात्री उशिरा ट्विट करून ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. ही आनंदाची बातमी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत त्याने प्रत्येकाने त्याच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहनही केले आहे. (Former Indian cricketer Yuvraj Singh became father)

युवराजने (Yuvraj Singh) ट्विट केले, "आमच्या सर्व चाहत्यांना, कुटुंबियांना आणि मित्रांना, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे की, आज देवाने आम्हाला आशिर्वादरूपी एक मुल आमच्या पदरी घातले आहे. बाळाच्या जन्माच्या या आशीर्वादासाठी आम्ही देवाचे आभार मानतो. या जगामध्ये आमच्या बाळाच स्वागत आहे." स्टार फलंदाज युवीने 2012 मध्ये कर्करोगातून बरे झाल्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये ब्रिटीश नागरिक हेझेल कीचशी साखरपुडा केला होता आणि एका वर्षानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न केले होते.

युवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अप्रतिम होती. त्याने आपल्या 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 402 सामने खेळले आणि या काळात त्याने 11778 धावा केल्या. युवराजने यादरम्यान 17 शतके आणि 71 अर्धशतकेही झळकावली. गोलंदाजीतही त्याने महत्त्वाचे योगदान दिले आणि 148 बळी घेतले. युवराजने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सात मालिका विजेतेपदही पटकावले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने 2011 चा विश्वचषकही जिंकला होता. त्यानंतर युवीने 350 हून अधिक धावा आणि 15 बळी घेतले होते. युवराजने 2000 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर 2019 मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: समुद्रात अडकून पडलेल्या 24 पर्यटकांना वाचविण्यात कोस्ट गार्डच्या जवानांना यश

Smart City Road : सांतिनेजमधील अर्धा टप्पा अपूर्ण; खरे आव्‍हान पावसाचे आणि रस्‍ते खचण्‍याचे

Vasco Rain : पावसाळ्‍यापूर्वी नाले, गटार स्‍वच्‍छ करणार : आमदार कृष्णा साळकर

Mega Project : सावरफोंड मेगा प्रकल्‍प बेकायदा;वनाधिकाऱ्यांकडून पाहणी

Tourist Rush At Morjim Beach: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर तोबा गर्दी; पर्यटकांसह स्थानिकांचीही वळली पावले

SCROLL FOR NEXT