Rahul dravid
Rahul dravidDainik Gomantak

राहुल द्रविडची डोकेदुखी वाढणार, हार्दिक पंड्याने दिलं चॅलेंज

भारतीय संघाला एका गोष्टीची सातत्याने उणीव जाणवली, आणि त्याच गोष्टीवर हार्दिक पंड्याने मीठ चोळण्याचा प्रयत्न केला.
Published on

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या वनडे मालिकेत पराभव झाला. या दौऱ्यात भारतीय संघाचा झालेला पराभव हा कसोटीपाठोपाठ झाला. त्या मुळे हा दैरा चांगलाच चर्चेत राहीला. या दौऱ्यात भारतीय संघाला एका गोष्टीची सातत्याने उणीव जाणवली, आणि त्याच गोष्टीवर हार्दिक पंड्याने मीठ चोळण्याचा प्रयत्न केला.

Rahul dravid
विराटनं कसोटीचं कर्णधारपद सोडलं होतं तेव्हा काय झालं होतं तुम्हाला माहितेय का?

काय म्हणाला हार्दिक पंड्या...

भारताला वनडे आणि कसोटी मालिकेत सतत एका गोष्टीची कमतरता भासली ती म्हणजे अष्टपैलू खेळाडूंची. वनडे मालिकेत वेंकटेश अय्यर या खेळाडूला संघात स्थान दिले होते, पण तो अपयशी ठरला. तर दुसरीकडे शार्दुल ठाकूर ( Shardul Thakur ) आणि दीपक चहरने (Deepak Chahar) चांगली कामगिरी केली, पण त्यांनी संघाला सामने जिंकवून दिले नाही. यावर हार्दिक पंड्या याने प्रतिक्रीया दिली आहे.

तो म्हणाला की, " भारतीय संघात मी पुनरागमन करणार आणि अष्टपैलू खेळाडू म्हणूनच खेळेन. माझी तयारी सुध्दा त्याच प्रमाणे सुरू आहे. पण यामध्ये जर मनासारखं घडलं नाही तर सांगता येत नाही. पण माझी तयारी चांगली सुरू आहे. येणारी वेळच सांगेल की, नेमकी माझी तयारी नेमकी कशी झाली आहे."

भारतीय संघात माझ्यासारखा एकही अष्टपैलू खेळाडू नाही, आणि त्यामुळे संघाला माझी उणीव भासत असल्याचे हार्दिकच्या या बोलण्यातून पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) हा युवा खेळाडूंना संघात घेऊन भारतीय संघाची विश्वचषकासाठी संघ तयार करत आहे. परंतू हार्दीक ने खेळाच्या संदर्भात प्रतिक्रीया दिल्यामुळे आता द्रविडची डोकेदुखी वाढू शकते. पण हेही खरे आहे की, हार्दिक संघातून बाहेर गेल्यानंतर भारताला चांगला अष्टपैलू खेळाडू मिळालेला नाही की जो सातत्यपूर्ण आणि चांगली कामगिरी करू शकेल.

Rahul dravid
विराटनं सोडलं T-20 चं कर्णधारपद, अनुष्काने दिली अशी प्रतिक्रिया...

त्यामुळेच आता हार्दिकने (Hardik Pandya) पुन्हा तयार होण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे हार्दिक पंड्या हा संघाच्या बाहेर आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अपयशी ठरत होता. त्यामुळे हार्दिकला त्याला संघातून बाहेर काढण्यात आले होते. हार्दिक हा काही दिवसांपासून दुखापतींनी ग्रस्त होता, परंतू तो आता पूर्णपणे फिट झाला आहे. अहमदाबाद संघाने त्याला आयपीएलमधील (Ipl)कर्णधार बनवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे हार्दिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, आणि भारतीय संघात परतण्याचे त्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com