Football legend Pele Dainik Gomantak
क्रीडा

Football legend Pele Passed Away: भारताच्या माजी कर्णधाराने पेले यांच्या आठवणींना दिला उजाळा

ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी वाहिली श्रद्धांजली

दैनिक गोमंतक वृत्तसेवा

महान फुटबॉलपटू पेले यांचा खेळ दैवी होता, प्रतिस्पर्धी बचावपटूंना गुंगारा देत गोल करण्याचे त्यांचे कसब एकमेवाद्वितीय होते. गोल नोंदविणाऱ्या पेले यांचे चित्र अजूनही डोळ्यांत साठलेले आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी फुटबॉल संघाचे कर्णधार ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी श्रद्धांजली वाहताना दिली.

गोलरक्षक ब्रह्मानंद पद्मश्री, अर्जुन पुरस्कार सन्मानित असून सध्या ते गोवा फुटबॉल विकास मंडळाचे (जीएफडीसी) अध्यक्ष या नात्याने कार्यरत आहेत. जादुई खेळाने फुटबॉलचे सम्राट बनलेले पेले यांचे गुरुवारी वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले.

``पेले यांचा खेळ अनुभवण्याचा आनंद काही औरच होता. मी चार वर्षांचा असतानाच पेले यांच्या फुटबॉल जादूने मोहित केले. मी फुटबॉल खेळण्यास सुरवात केली तेव्हा फक्त पेले हेच आदर्श होते. त्यांच्यामुळेच मी ब्राझील फुटबॉलच्या प्रेमात पडलो, ते आजतागायत कायम आहे. आमच्या काळात टीव्हीवरील फुटबॉलचे थेट प्रक्षेपण नव्हते, त्यामुळे चित्रित विश्वकरंडक सामने पाहिले, त्यातून पेले यांची फुटबॉलवरील हुकमत अनुभवता आली,`` असे ब्रह्मानंद म्हणाले.

पेले यांच्याबद्दल काही आठवणींना उजाळा देताना ब्रह्मानंद म्हणाले, ``1970 मधील मेक्सिकोत झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेचे धावचे समालोचन ऐकण्यासाठी माझ्या थोरल्या भावांनी गॅरेजमधील कार गुपचूपपणे माडांच्या खाली खुल्या जागेत नेली होती, फक्त पेले यांच्या असामान्य खेळाची अनुभूती घेणे हाच त्यामागचा उद्देश होता. पेले नामक अवलियाचा आनंद लुटण्यासाठी भल्या पहाटे जागलो. पणजीतील सिने नॅशनलमध्ये जायंट्स ऑफ ब्राझील हा सिनेमा उत्कठतेने पाहिला.``

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT