Footballer Wayne Rooney with family Twitter
क्रीडा

पत्नीने घातली फुटबॉलपटू वेन रूनीच्या घराबाहेर जाण्यावर बंदी

36 वर्षीय वेन रुनीवर त्याची पत्नी कॉलिनने चोवीस तास नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

फुटबॉल विश्वातील अनेक खेळाडू नेहमीच चर्चेत असतात. यापैकीच एक दिग्गज खेळाडू वेन रुनी (Wayne Rooney) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वेन रुनीच्या पत्नीने फुटबॉलपटूला (Football) एकट्याने घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे आणि आता त्याच्यावर 24 तास लक्ष ठेवले जात आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, 36 वर्षीय वेन रुनीवर त्याची पत्नी कॉलिनने चोवीस तास नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांचे 13 वर्षांचे वैवाहिक जीवन वाचवण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

कॉलिनने त्याच्या भावाला किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीला वेन रुनीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे जेणेकरून तो कुठे निघून जाऊ नये. वेन रुनीचे सतत नशेत राहणे आणि बाहेरील महिलांशी संबंध ठेवल्याने या दोघांनाही वैवाहिक जिवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या दोघांच्या लग्नात अनेकवेळा दुरावा आला आहे, ज्याचे मुख्य कारण दारू आहे. दारूच्या नशेत असलेल्या वेन रुनीने अनेकवेळा असे प्रकार केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जिवनात अनेकदा भांडणं झाली आहेत.

डार्बी काउंटीचा बॉल वेन रुनी याच कारणांमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये वेन रुनीचे काही फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये तो हॉटेलच्या खोलीत काही मुलींसोबत दिसला होता. विशेष बाब म्हणजे या आठवड्यात वेन रुनीच्या जीवनावरील बायोपिक प्रदर्शित होणार आहे. हा बायोपिक अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे, ज्याचे बजेट 1 मिलियन युरो सांगितले जात आहे. 2004 मध्ये वेन रुनीचे नावही एका सेक्स स्कँडलमध्ये आले होते. मँचेस्टर युनायटेडकडून खेळताना 21 वर्षांच्या एस्कॉर्टला 140 युरो देत शारिरीक संबध ठेवल्याचे पुढे आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोव्यात काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'गोवा रक्षण यात्रा'द्वारे जनसंपर्क अभियानावर मोठा भर

Goa recruitment: गोव्यात सरकारी कंत्राटी नोकरीची मोठी संधी! 'समग्र शिक्षा'अंतर्गत 37 पदांसाठी पर्वरी येथे वॉक-इन मुलाखत

Reis Magos: रेईश-मागूश ग्रामसभेत राडा! महिला सरपंचांसह शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ, धमकी देणाऱ्या संशयितावर गुन्हा दाखल

Mandovi River: मांडवी नदीचे पात्र प्रदूषितच! प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल अखेर उच्च न्यायालयात सादर

Goa Bench: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा! गोवा खंडपीठाचे आमदार संकल्प आमोणकरांसह स्थानिकांना थेट निर्देश; सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब

SCROLL FOR NEXT