IND vs WI: रोहितची मर्जी; विराटचा लाडला नव्हे या गड्यासोबत करणार डावाची सुरुवात

शिखर धवन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मयंक अग्रवालला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले. ईशान किशन आधीच बायो-बबलमध्ये असून त्याला आता वनडे संघातही त्याला स्थान देण्यात आले आहे.
Ishan Kishan
Ishan KishanDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा 6 फेब्रुवारीला होणार आहे. हे तीनही सामने अहमदाबाद येथिल नरेंद्र मोदी स्टेडीयमवर होणार आहे. या सामन्यात संघाच्या सलामीबाबत सतत प्रश्न उपस्थित केले जात होते. शिखर धवन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मयंक अग्रवालला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले. ईशान किशन आधीच बायो-बबलमध्ये असून त्याला आता वनडे संघातही त्याला स्थान देण्यात आले आहे.

Ishan Kishan
U19 World Cup: विराटचा युवा खेळाडूंना सल्ला; लवकरच रंगणार भारत इंग्लंड सामना

खेळली जाणारी ही वनडे भारताची 1000 वी वनडे असेल. पण आता धवन, ऋतुराज आणि अय्यर या त्रिकुटाला या मालिकेत खेळता येणार नाही हे निश्चित आहे, कारण त्यांना आठवडाभर क्वारंटाइन राहावं लागणार आहे आणि त्यानंतर आरटी-पीसीआर टेस्टमध्ये दोन वेळा निगेटिव्ह यावं लागणार आहे. शनिवारी टीम इंडियाचा (India) कर्णधार रोहितनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डेआधी मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

या मालिकेत तो पहिल्यांदाच फुट टाइम कर्णधार म्हणून उतरणार आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) मालिकेपूर्वी रोहितला दुखापत झाली होती आणि यामुळे तो कोणत्याच दौऱ्यात नव्हता. व्हर्चुअल पत्रकार परिषदेत त्यांनी संघासाठी पहिल्या वनडेत डावाची सुरुवात कोण करणार, याचाही खुलासा केला. जर ईशान किशनला वनडे संघात समाविष्ट करण्यात आलं असेल तर त्याला संधी दिली जाईल, असंही रोहितनं स्पष्ट केलं.

रोहित म्हणाला की, "सध्या ईशान हा आमच्याकडे एक पर्याय आहे. मयंकला संघात सामील करण्यात आले होते, पण तो अजूनही आयसोलेशनमध्ये आहे. तो प्रवासातून आला आहे आणि त्याला थेट संघाशी संपर्क साधता येणार नाही, त्यामुळे इशान पहिल्या सामन्यात माझ्यासोबत डावाची सुरुवात करताना दिसेल.

Ishan Kishan
IND vs WI: 'या' स्टार खेळाडूंशिवाय टीम इंडिया खेळणार वनडे

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडिया:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, शिखर धवन, इशान किशन, मयंक अग्रवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

वेस्टइंडीज ची वनडे टीम

कीरन पोलार्ड (कर्णधार), डैरेन ब्रावो, शामराह ब्रुक्स, ब्रैंडन किंग, फैबियन एलेन, एनक्रुमाह बोनर, जेसन होल्डर, शाइ होप, निकोलस पूरन, अकील हुसैन, अलजारी जोसेफ, कीमर रोच, रोमारियो शेफर्ड, ओडीन स्मिथ, हेडन वॉल्श।

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com