Under-19 World Cup 2022: देशाची नजर 5 व्या विजेतेपदाकडे!

आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपची चार विजेतेपदं जिंकली असून 5 फेब्रुवारी 2022 रोजी पुन्हा एकदा टीम इंडिया या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणार आहे.
Under-19 World Cup 2022
Under-19 World Cup 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

CC Under-19 क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात 1988 साली झाली, पण दुसरा हंगाम हा 1998 साली खेळवण्यात आला. यानंतर ही स्पर्धा दर दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येते. एकप्रकारे युवा क्रिकेटसाठी ही द्वैवार्षिक स्पर्धा आहे, त्यातला सर्वात यशस्वी संघ म्हणजे भारताचा संघ. भारताने आतापर्यंत आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपची चार विजेतेपदं जिंकली असून 5 फेब्रुवारी 2022 रोजी पुन्हा एकदा टीम इंडिया या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणार आहे. त्याआधी या स्पर्धेत टीम इंडियाचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे ते जाणून घेऊयात. (Under-19 World Cup 2022)

Under-19 World Cup 2022
IND vs WI: रोहितची मर्जी; विराटचा लाडला नव्हे या गड्यासोबत करणार डावाची सुरुवात

भारतीय संघाने पहिल्यांदा 1988 मध्ये अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये (World Cup) पाउल ठेवले. त्याच वर्षी भारतीय संघ हा सहाव्या स्थानावर राहिला. त्यानंतर दहा वर्षांनी 19 वर्षांखालील क्रिकेटचा दुसरा विश्वचषक खेळला गेला, ज्यामध्ये भारताचा संघ हा पाचव्या स्थानावर राहिला. तिसऱ्या स्पर्धेत म्हणजेच 2002 मध्ये भारताने पहिले विजेतेपद पटकावले होते. हा भारताने जिंकला होता. 2000 सालच्या 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा पराभव केला. यानंतर 2002 आणि 2004 सालच्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

2006 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताला अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी संघाचा कर्णधार रविकांत शुक्ला होता, तर रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि पियुष चावला यांच्यासारखे खेळाडू या संघात होते. 2008 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अंडर-19 वर्ल्ड कप खेळण्यासाठी मैदानात उतरली तेव्हा दक्षिण आफ्रिकेला 12 धावांनी पराभूत केले. 2010 मध्ये, हा संघ सहाव्या स्थानावर राहिला, ज्याचे नेतृत्व अशोक मेनरिया होते. 2012 साली अंतिम सामन्यात कर्णधार उन्मुक्त चंद याच्या नेतृत्वात संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत पुन्हा विजेतेपद पटकावले.

Under-19 World Cup 2022
IND vs WI: 'या' स्टार खेळाडूंशिवाय टीम इंडिया खेळणार वनडे

विजय जोल याने यूएईमध्ये 2014 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले होते. त्यात भारत पाचव्या हा स्थानावर राहिला होता. तर 2016 आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला (India)वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी संघाचा कर्णधार हा इशान किशन होता. 2018 मध्ये टीम इंडियाने पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा पराभव करत आपलं चौथं विजेतेपद पटकावलं होतं. तर 2020 मध्ये टीम इंडियाला प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता.

U19 Cricket World Cup मधिल टीम इंडियाचा ट्रॅक रेकॉर्ड इन

1988 - सहावे स्थान

1998 - पांचवां स्थान

2000 - विजेता (मोहम्मद कैफ)

2002 -तिसरे स्थान

2004 - तिसरे स्थान

2006 - उपविजेता

2008 - विजेता (विराट कोहली)

2010 - सहावे स्थान

2012 - विजेता (उन्मुक्त चंद)

2014 - पाचवे स्थान

2016 - उपविजेता

2018 - विजेता (पृथ्वी शॉ)

2020 - उपविजेता

2022 - अंतिम सामना खेळणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com