क्रीडा

ISL Football : ISLच्या प्ले-ऑफ फेरीचे स्वरुप बदलले; स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुरवातीचे सहा संघ ठरणार पात्र

प्ले-ऑफ फेरी 3 मार्चपासून; अंतिम सामना 18 मार्चला

किशोर पेटकर

ISL Football : इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेच्या 2022-23 मोसमातील अंतिम लढत 18 मार्च रोजी होईल. त्यापूर्वी तीन मार्चपासून प्ले-ऑफ फेरीसाठी मैदानावर चुरस दिसेल. आयएसएल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीचे स्वरुप यंदापासून बदलण्यात आले आहे. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच प्ले-ऑफ फेरीसाठी सुरवातीचे सहा संघ पात्र ठरतील.

गुणतक्त्यातील पहिला व दुसरा संघ थेट उपांत्य फेरीत खेळेल, तर उपांत्य फेरीतील बाकी दोन जागांसाठी गुणतक्त्यातील तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकावरील चार संघांत नॉकआऊट लढती होतील.

नॉकआऊट फेरी एकेरी पद्धतीने होईल, तर उपांत्य लढती दोन टप्प्यात खेळल्या जातील. आयएसएल अंतिम लढतीचे ठिकाण नंतर जाहीर होईल. कोविड-19 मुळे मागील मोसम बंद दरवाज्याआड खेळला गेला. तेव्हा अंतिम सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला होता.

सध्या चार जागांसाठी चढाओढ

आयएसएल स्पर्धेच्या सध्याच्या साखळी गुणतक्त्यानुसार माजी विजेता मुंबई सिटी व गतविजेता हैदराबाद एफसी या संघांनी प्ले-ऑफसाठी पात्रता मिळविली आहे. अन्य चार जागांसाठी चढाओढ आहे.

प्ले-ऑफ फेरी वेळापत्रक

नॉकआऊट 1 : 3 मार्च : गुणतक्त्यातील चौथा विरुद्ध पाचवा संघ

- नॉकआऊट 2 : 4 मार्च: गुणतक्त्यातील तिसरा विरुद्ध सहावा संघ

- उपांत्य फेरी : पहिला टप्पा : 7 मार्च : गुणतक्त्यातील पहिला विरुद्ध नॉकआऊट 1 विजेता संघ

- उपांत्य फेरी : पहिला टप्पा : 9 मार्च : गुणतक्त्यातील दुसरा विरुद्ध नॉकआऊट 2 विजेता संघ

- उपांत्य फेरी : दुसरा टप्पा : 12 मार्च : नॉकआऊट 1 विजेता विरुद्ध गुणतक्त्यातील पहिला संघ

- उपांत्य फेरी : दुसरा टप्पा : 13 मार्च : नॉकआऊट 2 विजेता विरुद्ध गुणतक्त्यातील दुसरा संघ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT