Kylian Mbappe & Lionel Messi  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA 2022: मैदानाबाहेरही एमबाप्पे मेस्सीला देतोय टक्कर, जाणून घ्या कोण आहे कमाईत पुढे

FIFA 2022: अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावले आहे. कर्णधार लिओनेल मेस्सीचे ट्रॉफी उंचावतानाचे फोटो सगळीकडे आहेत.

दैनिक गोमन्तक

Lionel Messi, Kylian Mbappe Net Worth And Annual Salary: अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावले आहे. कर्णधार लिओनेल मेस्सीचे ट्रॉफी उंचावतानाचे फोटो सगळीकडे आहेत. पण या फुटबॉल विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू. त्याचीही चर्चा कमी होत नाहीये. कारण त्याचा संघ विजेतेपदाच्या सामन्यात पराभूत झाला. त्यामुळेच त्याचे फोटो कमी दिसत आहेत. किलियन एमबाप्पे असे या फ्रेंच खेळाडूचे नाव आहे. एमबाप्पे आणि मेस्सी यांच्यात अंतिम फेरीत लढत झाली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी ही लढाई होती आणि या लढाईत एमबाप्पेने बाजी मारली. पण प्रत्येक सामन्यानंतर एक गोष्ट सुरु होते आणि ती म्हणजे खेळाडूंची तुलना. चाहते खेळाडूंची त्यांच्या खेळापासून त्यांच्या कमाईशी तुलना करु लागतात.

एम्बाप्पेने चार गोल केले

अर्जेंटिना आणि फ्रान्स (France) यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात एम्बाप्पेने चार गोल केले. एम्बाप्पेने अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवून इतिहास रचला. विश्वचषक स्पर्धेत 8 गोलसह त्याने गोल्डन बूट जिंकला. 23 वर्षीय एम्बाप्पेने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अशी कामगिरी केली, जी अनेक शतके स्मरणात राहील.

किती कमाई आहे

लिओनेल मेस्सीने फिफा विश्वचषक 2022 मध्ये एकूण सात गोल केले. मात्र सामना हरल्यानंतरही एमबाप्पे हा या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आहे. या विश्वचषकात त्याने एकूण आठ वेळा चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला. दुसरीकडे, मेस्सी आणि एम्बाप्पेच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, दोघांमध्ये खूप फरक आहे. फोर्ब्सच्या मते, 2022 मध्ये एम्बाप्पेची ऑन आणि फील्ड कमाई $43 दशलक्ष आहे. त्याने Nike आणि Hublot यासह अनेक ब्रँड्ससोबत पार्टनरशिप केली आहे. तसेच, मेस्सीची ऑन आणि फील्ड कमाई $130 दशलक्ष इतकी आहे. अशाप्रकारे मेस्सी एमबाप्पेच्या खूप पुढे आहे.

मेस्सी आणि एम्बापे यांच्या कमाईत फरक

अहवालानुसार, एम्बापेची एकूण संपत्ती $150 दशलक्ष असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, लिओनेल मेस्सीची एकूण संपत्ती $600 दशलक्ष आहे. पण हे लक्षात घ्यावे लागेल की, मेस्सी आता कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि 23 वर्षीय एमबाप्पेला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. फुटबॉल क्लब एमबाप्पेवर पैशांचा पाऊस पाडू शकतात. Mbappé साठी ब्रँड व्हॅल्यू देखील वाढेल आणि यासोबतच त्याची कमाई देखील वाढेल.

एमबाप्पेला गोल्डन बूट आणि मेस्सीला गोल्डन बॉल

पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने 4-2 असा विजय मिळवला. अंतिम सामन्यात लिओनेल मेस्सी एका बाजूला तर किलियन एम्बापे (Kylian Mbappe) दुसऱ्या बाजूला होता. एकीकडे मेस्सीने गोल करत संघाचे खाते उघडले, तर किलियन एम्बाप्पेने आपल्या संघासाठी दमदार पुनरागमन केले. एका क्षणी अर्जेंटिना 2-0 ने आघाडीवर असताना केलियन एमबाप्पेने दोन मिनिटांत दोन गोल करुन फ्रान्सला बरोबरी साधून दिली.

शिवाय, एमबाप्पेने अतिरिक्त वेळेतही गोल केला आणि अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक करण्याचा विक्रम केला. गोल्डन बूट किलियन एम्बाप्पेकडे गेला, तर गोल्डन बॉल लिओनेल मेस्सीने जिंकला. या विश्वचषकात मेस्सीने एकूण 7 गोल केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT