FC Goa dainikgomantak
क्रीडा

एफसी गोवाची रोमहर्षक बरोबरी

आयएसएल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सविरुद्ध सलग दहा सामने अपराजित

दैनिक गोमन्तक

पणजी : अतिशय रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात बदली स्पॅनिश खेळाडू आयराम काब्रेरा याच्या हॅटट्रिकमुळे एफसी गोवाने पिछाडीवरून मुसंडी मारली, पण नंतर अखेरच्या दोन मिनिटांत दोन गोल स्वीकारल्यामुळे केरळा ब्लास्टर्सने त्यांना आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत 4-4 असे गोल करत बरोबरीत रोखले. सामना रविवारी बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाला. (FC Goa won 10 matches against Kerala Blasters)

शेवटच्या साखळी सामन्यातील बरोबरीसह एफसी गोवाने (FC Goa) आयएसएल फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सविरुद्ध सलग दहा सामने अपराजित राहण्याचा पराक्रम साधला. दोन्ही संघांची स्पर्धेच्या आठव्या मोसमातील मोहीम संपली. केरळा ब्लास्टर्सची (Kerala Blasters) कालच उपांत्य फेरीतील जागा निश्चित झाली होती. स्पर्धेतील सातव्या बरोबरीमुळे त्यांचे 20 सामन्यांतून 34 गुण झाले व चौथा क्रमांक कायम राहिला. एफसी गोवानेही स्पर्धेत सातवी बरोबरी नोंदविली. 20 लढतीनंतर 19 गुणांसह ते नवव्या क्रमांकावर राहिले.

अर्जेंटिनाचा (Argentina) जोर्जे परेरा डायझ याने 10व्या मिनिटास व नंतर 25व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर केलेल्या गोलमुळे केरळा ब्लास्टर्स विश्रांतीला 2-0 फरकाने आघाडीवर होता. तेच सामना जिंकणार असे चित्र होते. मात्र बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरलेल्या आयराम काब्रेरा याने कमाल केली. त्याने 49व्या मिनिटास आणि नंतर 63व्या मिनिटास पेनल्टीवर गोल करून एफसी गोवास 2-2 अशी बरोबरी साधून दिली. 79व्या मिनिटास बदली खेळाडू ऐबान डोहलिंग याने केलेल्या लाजवाब गोलमुळे एफसी गोवास 3-2 अशी, तर नंतर 82व्या मिनिटास काब्रेराने हॅटट्रिक साधल्यामुळे एफसी गोवास 4-2 अशी आघाडी मिळाली. मात्र 88व्या मिनिटास व्हिन्सी बार्रेटो व 90व्या मिनिटास स्पॅनिश (Spanish) अल्वारो वाझकेझ याने केलेल्या गोलमुळे केरळा ब्लास्टर्सने पराभव टाळत बरोबरीचा गुण प्राप्त केला. हे दोन्ही खेळाडू बदली या नात्याने उत्तरार्धात मैदानात आले होते.

‘शिल्ड’साठी आज लढत

फातोर्डा (Fatorda) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (Pandit Jawaharlal Nehru Stadium) सोमवारी (ता. 7) जमशेदपूर एफसी व एटीके मोहन बागान यांच्यातील सामना लीग विनर्स शिल्डचा मानकरी ठरविणार आहे. गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविणारा संघ शिल्डचा मानकरी ठरेल व पुढील मोसमातील एएफसी चँपियन्स लीग (AFC Champions League) स्पर्धेसाठी पात्र ठरेल. सलग सहा सामने जिंकलेला जमशेदपूर एफसी संघ (Jamshedpur FC team) 40 गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर ओळीने 15 सामने अपराजित राहून आयएसएल विक्रमाशी बरोबरी साधणारा एटीके मोहन बागान संघ 37 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण!देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

Yuri Alemao: 'नोकरी घोटाळ्यातील सूत्रधार समोर यावा'! 'Cash For Job' वरुन आलेमाव यांची मागणी

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

SCROLL FOR NEXT